हिमायतनगर प्रतिनिधी/ महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे माजी आ.नागेश पाटील आष्टीकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 27 जुलै रोजी निष्ठावंत शिवसैनिक संतोष पुलेवार यांनी वृक्षारोपणाचे आयोजन केले व माझ्या दोन्ही शिवसेना नेत्यांना उदंड आयुष्य मिळावे यासाठी महादेवाचा अभिषेक करून प्रार्थना केली आहे.
हिमायतनगर तालुक्यातील ग्रामीण भागात निष्ठावंत शिवसैनिकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध उपक्रमाचे आयोजन केले होते. पोटा बु येथील शिवसेनेचे संतोष पुलेवार यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व माजी आ. नागेश पाटील आष्टीकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने
शंभु महादेवाचा ( माळावरील ) अभिषेक व महाआरतीचे आयोजन केले होते. व वृक्षारोपण देखील केले आहे. आमचे नेते माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व माजी आ.नागेश पाटील आष्टीकर यांना वाढदिवसाच्या निमित्ताने उदंड आयुष्य मिळावे यासाठी दरवर्षी शंमु महादेवाचा अभिषेक करण्यात येतो यावर्षी देखील केला असल्याचे संतोष पुलेवार यांनी सांगितले. यावेळी
जेष्ठ शिवसैनिक उत्तमराव माने, गजानन पाटील सुर्यवंशी,बंडु देशमुख,बाऴू खडके, युवराज देशमुख,माधव डोखळे, शामराव डोखळे, नागनाथ वच्छेवाड, धोंडीबा घुमनर, अजिंक्य पिन्नलवार,आकाश ठाकरे,बबन माने, नागोराव जळपते, सुनील जाधव, विशाल अललवाड, बालाजी गायके, मारोती जळपते, सुर्यवंशी सर, आनंद जाधव, बजरंग पोटेकर, यांच्या मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते.
