हिमायतनगर पंचायत समिती कार्यालयात अनेक जागा रिक्त- जनतेच्या कामाचा खोळंबा

हिमायतनगर प्रतििनिधी ( सोपान बोंपीलवार) येथील पंचायतीला अभ्यासु कर्तबगार युवा गटविकास अधिकारी मयुर आदेलवाड लाभले आहेत.पंरतु पंचायत समितीच्या कार्यालयात गेल्या लेखाविभागासह विविध विभागांतील कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त असल्याने कामांना विलंब होत नसेल काय या बाबींचा आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्या सह जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लक्ष देऊन येथील रिक्त जागा भरण्याची मागणी केली जात आहे. पंचायत समिती कार्यालयातील वरिष्ठ सहाय्यक तिनं मंजुर असुन दोन कार्यरत तर एक रिक्त आहे. कनिष्ठ सहाय्यक दहा मंजुर असुन तिनं रिक्त असुन एक निलंबित तर एक अनधिकृत गैरहजर आहे.पाच कनिष्ठ सहाय्यकावर काम चालू आहे.सहायक लेखाधिकारी हे पद रिक्त आहे.कनिष्ट लेखाधिकारी, वरीष्ठ सहायक लेखाधिकारी, कनिष्ठ सहाय्यक लेखाधिकारी ही तिन्ही ही पदे रिक्त आहेत.ग्रामसेवक ३९ मंजुर असुन ६ रिक्त आहेत.ग्रामविकास अधिकारी सहा मंजुर असुन एक रिक्त आहे.एकदरीत येथील पंचायत समितीच्या कार्यालयात चौदा पंधरा जागा रिक्त आहेत. चौकट गटविकास अधिकारी कार्यतत्पर, अनेक जागा रिक्त मुळे ताण ! येथील पंचायत समितीला युवा अभ्यासु कार्यतत्पर गटविकास अधिकारी मयुर आदेलवाड हे लाभले आहेत.त्याच्या कार्याची प्रशंसा आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी केली आहे. रिक्त जागेमुळे कार्यरत अधिकारी, कर्मचारी वर्गावर ताण पडत आहे.पचायत समिती कार्यालयासह ग्रामसेवकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी आ.माधवराव पाटील जवळगावकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.