हिमायतनगर प्रतिनिधी/ तालुक्यातील दुय्यम बाजार पेठ असलेल्या कामारी गावाला अंतर्गत विकासासाठी कोटी रुपयांच्या वर निधी दिल्याबद्दल ग्रामस्थांनी जवळगाव येथे भेट देऊन आ.माधवराव पाटील जवळगावकर यांचे शतशः आभार मानले.गावाच्या समस्या मार्गी लागल्या हो परंतु शेतकऱ्यांना पांदन रस्ते मार्गी लाऊन सुविधा करा म्हणून अक्षरक्ष ऊपसरपंच, बाजार समितीचे संचालक अशोकराव पाटील शिरफुले यांनी टाफो फोडला.आपल्या गावातील बळीराजा शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी टाहो फोडणारे ऊपसरपंच शिरफुले पाटील यांची गंभीर दखल आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी घेतली.आपण कामारीकर जवळगावकर परीवारावर अतुट असा जीव लावला आहात.आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मी कुठेही कमी पडणार नसल्याची ग्वाही आ.जवळगावकर यांनी दिली.थोडासा धीर धरा तुमच्या आशिर्वादा मूळे मी आपल्या सोबत आहे.जवळगाव म्हणजे कामारी समजून सदैव आपल्या गावच्या पाठिशी खंबीरपणे सोबत राहण्याचा शब्द ही आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी दिला.याप्रसगी माजी सभापती जोगेंद्र नरवाडे माजी चेअरमन राजीव पाटील शिरफुले, सरपंच प्रतिनिधी अँड विजयकुमार सोनुले विनायकराव देवराये यांच्या सह अनेकांची उपस्थिती होती.
