हिमायतनगर नगरपंचायतीत महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती साजरी

हिमायतनगर प्रतिनिधी/येथील नगरपंचायत कार्यालयात सोमवारी महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी ज्योतिराव फुलेच्या प्रतिमेचे पूजन मुख्याधिकारी शामकांत जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.

त्यानंतर उपस्थित सर्व अधिकारी कर्मचारी यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करून दर्शन घेतले. यावेळी खा.हेमंत पाटील यांचे जनसंपर्क अधिकारी गोविंद गोडसेलवार, कार्यालय अधीक्षक चंद्रशेखर महाजन, रत्नाकर डावरे, रफिक अहेमद, बालाजी माळचापुरे, रमाकांत बाच्छे, मारोतराव हेंद्रे, विठ्ठल शिंदे, बालाजी हरडपकर, शेख महेबूब, संदीप उमरे, शेख यासीन, राहुल सर्जेराव, श्याम पाटील, शेख मोजमिल, रामदास हेंद्रे, शेख रबानी, शेख मुख्तार यांच्यासह पाणीपुरवठा, विद्युत व स्वच्छता विभागाचे सर्व कर्मचारी सहभागी आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.