हिमायतनगर प्रतिनिधी/ तालुक्यातील मौजे कार्ला पी.येथील एका शेतकऱ्याने बटाईने केलेल्या शेतातील दीड एकरातील हरभऱ्याच्या गंजीला कोण्यातरी अज्ञातांनी आग लावली आहे. हि घटना रामनवमीच्या रात्रीला घडली असून, यामुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. याच आठवड्यात गावातील अन्य एका शेतकऱ्यांच्या गोठ्याला देखील अज्ञातांनी आग लावली होती. त्यातही शेतकऱ्यांचे वैरणासह साहित्य जळुन मोठे नुकसान झाले आहे. एकाच आठवड्यात अशा दोन घटना घडल्यामुळे याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, यंदा खरिपात झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीमुळे अगोदरच शेतकरी हैराण झाला आहे.याच आठवड्यात कारला येथील शेतकरी किसन एटलेवाड यांच्या शेतातील आखाड्यास तिन दिवसा पुर्वी एका अज्ञातांनी रात्रीच्या वेळी आग लावली त्यामुळे आखाड्यातील वैरणासह शेती अवजारे, खत जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यानंतर दि. 10 एप्रिल च्या रात्री मौज कार्ला पी. येथील शेतकरी दत्ता यमजलवाड यांनी हिमायतनगरचे शेतकरी बंडू भंडारे यांच्या शेत सर्वे नंबर २५० मधील दीड एकर शेत बटाईने केले. आणी त्यात खरिपाचे नुकसान भरून काढणायसाठी हरभरा घेतला होता. त्या हरभऱ्याची काढणी करून गंजी मारून ठेवली होती. तसेच्या त्यांच्या स्वतःचं शेतातील उन्हाळी ज्वारीचाही ढग करण्यात आला. होता. हल्लर मशीन उपलब्ध झाल्यानंतर शेतीचा माल काढण्याच्या तयारीत शेतकरी होता.
दरम्यान रामनवमीच्या दिवशी सायंकाळी नित्त्याप्रमणे ते घराकडे आल्यानंतर हरभऱ्याच्या ढगाला कोण्यातरी अज्ञाताने आग लावली. त्याच्या बाजूला असलेल्या उन्हाळी ज्वारीलाही हि आग पोचली. मात्र वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने ती विझवली गेली. परंत्तू हरभऱ्याच्या गंजीची आगीत राख झाली आहे. या घटनेमुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाले असून, या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. कारला शिवारात एकाच आठवड्यात दोन शेतकऱ्यांच्या हरभरा ढगाला व आखाड्यास आग लावण्याच्या घटना घडल्या आहेत हि गंभीर बाब असुन तात्काळ या अज्ञातांचा शोध घ्यावा अशी मागणी पोलीस निरीक्षक भगवान कांबळे यांच्याकडे तंटामुक्तीचे अध्यक्ष डॉ गफार यांनी केली आहे.
