जय श्री रामाच्या जयघोषात हिमायतनगरात रामनवमीची उत्सव व शोभायात्रा उत्साहात

हिमायतनगर प्रतिनिधी/- शहरात दरवर्षी सार्वजनिक श्रीराम जन्मोत्सव समिती व बजरंग दल तर्फे भव्य राम जन्मोत्सव साजरा केला जातो पण कोरोना संकटामुळे तब्बल दोन वर्षांनंतर या वर्षी हिमायतनगर शहरात रामनवमीचा उत्सव साजरा मोठ्या आनंदात करण्यात आला त्यामूळे शहरातील नवतरूण युवकांमध्ये चागलाच उत्साह संचारल्याचे पाहण्यास मिळाला आहे यावेळी उपस्थित मान्यवरांनी प्रथमतः प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन केले व जय श्री रामाचा जयघोष केला

 कोरोना महामारीमुळे गेले दोन वर्ष आपणास कोणतेच सण, उत्सव व धार्मिक कार्यक्रम साजरे करता आले नाही पण यावर्षी शासनाने धार्मिक कार्यक्रमावरील सर्व निर्बंध उठऊन धार्मिक उत्सव साजरे करण्याची परवानगी दिल्याने शहरातील सार्वजनिक श्रीराम जन्मोत्सव समिती व बजरंग दल तर्फे दि 10 एप्रिल रोजी शहरातील श्री परमेश्वर मंदिर येथून भव्य अशी शोभयात्रा काढून प्रभू श्रीरामाच्या जय घोषात राम नवमी उत्सव साजरा करण्यात आला त्यात असंख्य नव तरुण युवकांन मध्ये यावर्षी चागलाच उत्साह संचारल्याचे पाहण्यास मिळाले 

 यावेळी हिमायतनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवान कांबळे,तहसील चे नायब तहसीलदार तामसकर साहेब,नगराध्यक्ष कुणाल राठोड,शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ ठाकरे, विलास वानखेडे,शाम रायेवार,मुन्ना जनावांर ,ज्येष्ठ शिवसैनिक विठ्ठल ठाकरे, ज्ञानेश्वर शिंदे, उत्तरवार सर, दिक्कतवार सर, बाळु अन्ना चवरे,गजानन हरडपकर, राम नरवाडे, आशिष सकवान,राम सूर्यवंशी, खंडू सर, सह आदी रामभक्त उपस्थित होते या शोभयात्रेचे आयोजन बंजरंग दल तालुका संयोजक गजानन चायल,विपुल दंडेवाड,लक्ष्मण डांगे,माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड, विलास वानखेडे,दुर्गेश मंडोजवार,प्रकाश रामदिनवार,सावन डाके,शुभम दंडेवाड,मंगेश शिंदे सह आदी जणांनी केले

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.