हिमायतनगर प्रतिनिधी/ युक्रेन मध्ये सुरू असलेल्या यूधजन्य परिस्थिती मध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यी मोठ्या संकटात अडकले होते.आपली मुले संकटात अडकल्यामुळे पालक चिंतेत होते .भारतीय प्रशासनाच्या मदतीने विद्यार्थ्यी सुखरूप मायदेशी परतले असुन हिमायतनगर तालुक्यातील चार विद्यार्थ्यी घरी आले असुन त्यांचा महसूल प्रशासनाकडून नायब तहसीलदार व्हि. पी. राठोड यांनी भेट घेऊन स्वागत केले आले आहे.
हिमायतनगर शहरातील तेजस गायकवाड,सौरभ रोकडे,संतोष जाधव ,अजित हराळे,व कारला येथील ओमप्रकाश चव्हाण हे वैद्यकीय शिक्षणासाठी काही महिन्यांपूर्वी यूक्रेन येथे गेले होते. परंतु रसिया यूक्रेन मध्ये यूधजन्य परिस्थिती सुरू असल्यामुळे भारतीय विद्यार्थ्यी संकटात सापडले होते. तेथील परिस्थिती पाहून विद्यार्थ्यांचे आई वडील कुटुंबिय भयभीत होते.पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे आमची लेकरे या संकटातून घरी सुखरूप आली असल्याची प्रतिक्रिया कुटुंबियांनी दिली आहे.
तहसिलदार डी. डी. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कारला येथील ओमप्रकाश चव्हाण या विद्यार्थ्यांची नायब तहसीलदार व्हि. पी. राठोड यांनी भेट घेऊन यूक्रेन परिस्थिती विषयी माहिती घेतली व त्यांचा सत्कार केला. यावेळी मंडळ अधिकारी बि. पि. राठोड, नाथा चव्हाण, जांबुवंत मिराशे,रामराव मोरे, राजेश ढाणके यांच्यासह कारला येथील नागरीकांनी ओमप्रकाश चव्हाण यांचा सुखरूप मायदेशी परतल्यामुळे सत्कार केला आहे.
