हिमायतनगर प्रतिनिधी/महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलिस उपनिरीक्षक पदी नदेश्र्वर तुंबलवांड व विक्रीकर निरीक्षक म्हणून संदीप ताटीकोंडलवार यंची निवड झाली.. त्याबद्दल राष्ट्रवादी काँगेस पार्टी हिमायतनगर तर्फे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या ह्या दोन तरुणांनी स्वतःच्या मेहनतीने यश मिळवले याबद्दल परिसरात त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.. याच निमित्ताने हिमायतनगर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष सुनिल पतंगे यांनी व सर्व राष्ट्रवादी कर्यार्त्यानी सत्कार सोहळ्याचे आयोजन केले. यावेळी तालुका अध्यक्ष सुनिल पतंगे, अनंता देवकते,शिवसेनेचे विठ्ठल ठाकरे, संतोष पुलेवार,सरपंच मारोती वाडेकर, आकाश सुर्यांवंशी, गणेश राच्चेवर, आशुतोष बोरेवड, प्रशांत सूर्यवंशी, साईनाथ कोथळ कर , दाऊ गडगेवाड , कान्हेया शिर्षेवड, रमेश राच्चेवार, संजय रचेवार यासह इतर कार्यकर्त्यांची उपस्थिती होती
