हिमायतनगर प्रतिनिधी/ पळसपूर येथील कांग्रेस पक्षाचे माजी सभापती वामनराव वानखेडे यांच्या मुलांचे दुख:द निधन झाले असून वानखेडे परिवाराच्या दुखात सहभागी होत कुटुंबियांची भेट घेऊन आ. जवळगावकर यांनी सांत्वन केले आहे.
तालुक्यातील पळसपूर येथील माजी सभापती वानमनराव वानखेडे यांचा मुलगा संजय वानखेडे यांचे अल्पशा आजाराने दुखद निधन झाले आहे. संजय वानखेडे एक मनमिळावू व्यक्तीमत्व म्हणून परिचित होते. त्यांच्या अकाली निधनाने वानखेडे परिवारावर मोठे दुख कोसळले आहे. वानखेडे परिवाराच्या दुखात सहभागी होऊन शनिवारी आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी माजी सभापती वामनराव वानखेडे यांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी सुभाष राठोड, गजानन सुर्यवंशी,डॉ, प्रकाश वानखेडे, शिवाजी पाटील, यांची उपस्थिती होती. याबरोबरच पळसपूर येथील जेष्ठ नागरिक किशनराव सटवाजी कदम डोलारकर यांचे वृध्दापकाळाने निधन झाले त्यांच्या कदम कुटुंबियांची भेट घेऊन आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी सांत्वन केले आहे.
