हिमायतनगर प्रतिनिधी/ तालुक्यातील सोनारी फाटा येथून मागील काही दिवसापासून अवैद्य मुरमाची उत्खनन सुरूच असून याकडे मात्र महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे चित्र सध्यातरी पहावयास मिळत आहे सोनारी येथून रात्री बारा ते चारच्या सुमारास अवैध मुरमाची उत्खनन मोठ्या प्रमाणात जेसीबी ट्रॅक्टर द्वारे अवैध वाहतूक केली जात असून याकडे मात्र महसूल प्रशासनाचे अक्षरशा दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.हिमायतनगर येथून अकरा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सोनारी येथून काही मुरुम माफिया कधी दिवसाढवळ्या तर कधी रात्री च्या सुमारास सोनारी येथील माळातुन मुरमाची अवैध उत्खनन उपसा करून आपले उखळ पांढरे करत असल्याचे चित्र सध्यातरी पहावयास मिळत आहे परंतु या बाबीकडे सोनारी मंडळाचे मंडळ अधिकारी व तलाठी महसूल चे नायब तहसीलदार यांचे अक्षरशा दुर्लक्ष असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे महसूल प्रशासनाकडून करत असलेल्या कारवाईमध्ये नव्यानेच अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना पकडून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करुण महसूल प्रशासनाची दिशाभूल करत आहे. मागील काही वर्षापासून सोनारी परिसरातील आठ्ठल मुरुम माफिया वर अद्याप कुठलीही दंडात्मक कारवाई झाल्याचे अद्यापतरी सामान्य जनतेच्या नजरेस आले नसल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे चित्र दिसून येत आहे वर्षानुवर्षे अवैध मुरमाची उत्खनन करून सामान्य जनतेला अवाच्या सव्वा दराने मुरुम देऊन स्वतः गडगंज होऊन अधिकाऱ्यांनाही गड गंज चे करण्याचा काम येथील आठ्ठल मुरुम माफिया करत असल्याचे सामान्य नागरिकांतून बोलल्या जात आहे सोनारी परिसरातील सामान्य जनतेला अव्वा च्या सव्वा दराने होणारी लूट व अवैध मुरमाची उत्खनन करणाऱ्या माफीया वर कधी आळा बसणार असे सामान्य माणसाच्या तोंडातून ऐकायला मिळत आहे.जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर लक्ष देऊन सामान्य जनतेची होणारी लूट थांबवतील काय? त्याचबरोबर हिमायतनगर येथील महसूल प्रशासनाचे कर्मचारी स्वतःचे हित पहात असल्यामुळे मागील दोन वर्षापासून अवैध मुरमाची वाहतूक होत असल्याने शासनाच्या तिजोरी राहून शासनाचा महसूल करोडो रुपयाचा बुडत आहे याकडे जिल्हाधिकारी डॉ. बिपिन इटनकर यांनी लक्ष देवुन शासनाचा करोडो रुपयांचा महसुल बुडत असलेला व सामान्य जनतेची लुट होणारी थांंबवतील का असे अनेक प्रश्नचिन्ह सामान्य जनतेच्या समोर निर्माण झाला आहे.
