जवळगावात राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने प्रयोगाच्या माध्यमातून विज्ञान दिवस साजरा....
विज्ञानदिनी अ. भा. अंनिस ने जादूटोणा विरोधी कायद्याचा केला प्रसार ...
हिमायतनगर प्रतिनिधी/जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळा जवळगाव तालुका हिमायतनगर येथे 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले यामध्ये अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा शाखा नांदेड ते कार्यकर्ते यांना बोलावून विज्ञानाचे प्रयोग व प्रात्यक्षिक अंधश्रद्धा निर्मूलन याविषयी सखोल असे मार्गदर्शन करण्यात आलेले होता
या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषद शाळेचे जेष्ठ विषय शिक्षक श्री माळगे सर हे होते प्रमुख वक्ते हिंगोली जिल्हा संघटक ऍड. प्रकाश मगरे, नांदेड जिल्हा संघटक प्रा. इरवंत सुर्यकर ,मराठा सेवा संघ -संभाजी ब्रिगेडचे हिंगोली जिल्हाध्यक्ष नामदेव कराळे, प्रा.नरसिंग वझरकर यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळा जवळगाव येथील विज्ञान विषय शिक्षक श्री. वसंत गोवंदे सर यांनी केले होते
या कार्यक्रमाचा सुंदर सूत्रसंचालन सौ.येरमवार मॅडम व मान्यवरांचा परिचय मा.वसंत गोवंदे यांनी केले
या कार्यक्रमाला शुभेच्छा म्हणून नांदेड जिल्हा संघटक प्रा.इरवंत सुर्यकर यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन व विद्यार्थ्यांमध्ये नाविन्यपूर्ण कल्पकता,राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या शुभेच्छा दिल्या
या कार्यक्रमात जादूचे प्रयोग व प्रात्यक्षिक एडवोकेट प्रकाश मगरे यांनी विद्यार्थ्यांना सोप्या व सुलभ भाषेत वेगवेगळ्या प्रयोगाद्वारे त्या भूमिका व वैज्ञानिक दृष्टिकोन कसा रुजवावा आणि आणि ही मुलांची पिढी भावी विवेकवादी रुजला पाहिजे आणि समाजामध्ये भोंदू बाबा बुवा यांच्या माध्यमातून भोंदूगिरी चे प्रकार वाढत आहेत त्याला आळा घालायचा असेल तर अंधश्रद्धेवर मूठमाती दिली पाहिजे त्याचबरोबर विविध भागात घडणाऱ्या घटनांवर प्रकाश टाकण्यात आला जादूटोणा विरोधी कायदा 2013 च्या अनुषंगाने कायद्याच्या संपूर्ण बाबी व घटनात्मक तरतुदी कलम 51A(H) मधील तरतुदीनुसार वैज्ञानिक दृष्टिकोन क विवेकवादी बनावे असे प्रतिपादन केले...या वेली शाळेतील शिक्षक श्री.चेपूरवार ,श्री. मुंडकर श्री. पडगिलवार श्री. कदम श्रीमती. येरमवार श्रीमती ढोकाडे श्रीमती मुस्कावाड श्रीमती गुरूफळे यासह विद्यार्थ्यां उपस्थित होते.
