हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिरात धार्मिक कार्यक्रमाची सुरुवात

हिमायतनगर प्रतिनिधी/येथील श्री परमेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्ताने धार्मिक कार्यक्रमाला सुरुवात झाली असून, उद्या महाशिवरात्री दिनी शासकीय अभिषेक महापूजा होऊन श्रीचा अलंकार सोहळा थाटामाटात संपन्न होणार आहे.

विदर्भ, मराठवाडा, कर्नाटक, तेलनगन, आंध्रप्रदेशासह राज्यातील कानाकोप-यातुन भावीक भक्त श्री परमेश्वर दर्शनासाठी हजेरी लावतात. गेल्या दोन वर्षापासन कोरोगामुळे अनेकांना श्रीदर्शन घेता आले नाही. यंदा यात्रा नसली तरी श्रीदर्शन घेता येणार असल्याचा आंदण भाविकांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे. महाशिवतारीच्या रात्रीला शासकीय महापूजा श्रीचा अलंकार सोहळा मंदिर कमिटीचे पदसिद्ध अध्यक्ष तहसीलदार दि.एन.गायकवाड यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर सप्ताहाच्या शेवटी काल्याच्या कीर्तन दिनापर्यंत भाविकांना सप्ताह निमित्त विना पारायण, कीर्तन कोरोनाचे नियम पाळून श्री परमेश्वराचे अलंकारमय दशर्न घेता येणार आहे.
 
त्यामुळे सप्ताहात स्थानिक भाविक भक्ताना मंदिरात सोशल डिस्टन्स ठेऊन श्री परमेश्वर महाराज आणि शिवपती महादेवाचे दर्शन घेता येईल. असे आवाहन मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ, राजेश्वर चिंतावार, लक्ष्मण शक्करगे, प्रकाश शिंदे, विठ्ठलराव वानखेडे, वामनराव बनसोडे, मुलचंद पिंचा, प्रकाश कोमावार. संभाजी जाधव, दे.ल.मुधोळकर, श्याम पवणेकर, माधव पाळजकर, मथुराबाई भोयर, लताबाई पाध्ये, लताबाई मुलंगे, अनंता देवकते, शांतीलाल श्रीश्रीमाळ, एड.दिलीप राठोड, अनिल मादसवार, बाबुराव भोयर गुरुजी आदींसह मंदिर कमिटीचे संचालक मंडळी व गावकर्यांनी केले आहे. 
--

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.