परमेश्वर सर्वाना सुखी - समृद्धी ठेव.. श्री परमेश्वराला आ.माधवराव पाटील जवळगावकर यांचे साकडे

हे परमेश्वर सर्वाना सुखी - समृद्धी ठेव.. श्री परमेश्वराला आ.माधवराव पाटील जवळगावकर यांचे साकडे
महाशीवरात्रीच्या पावन पर्वावर हजारो भावीकांनी घेतले वाढोण्याच्या श्री परमेश्वराचे दर्शन
हिमायतनगर प्रतिनिधी/ हर हर महादेव... परमेश्वर भगवान कि जय...च्या नामघोषात वाढोणा - वारणावतीचे जागृत देवस्थान श्री परमेश्वर दर्शनासाठी माघ कृ.१३ दि.०१ सोमवारी आलेल्या महाशिवरात्रीच्या शुभमुहुर्तावर जिल्हयासह मराठवाडा - विदर्भ - तेलंगणा, कर्नाटक, आंध्रप्रदेशातील हजारो भावीकांनी श्रीचे दर्शन घेतले. त्यामुळे मंदिर परिसरात भक्तांच्या मंदियाळीमुळे शहरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. दोन वर्षांपासून दर्शन झाले नसल्याबाई यावेळी अनेक भक्तानी महाशिवरात्रीच्या दिवशी पारण्याच्या उपवास धरुन मध्यरात्री १ वाजल्या पासुनच दर्शनासाठी मंदिर प्रांगणात रांगा लावल्या होत्या.  

हिमायतनगर येथील श्री परमेश्वर देवस्थानतर्फे दरवर्षी मोठी यात्रा भरविली जाते. मात्र कोरोनामुळे यात्रा रद्द करण्यात आली असून, केवळ श्री दर्शन घेता येत असल्यामुळे मंदिराचा कळस, मुख्य कमानीवर आकर्षक विद्दुत रोषनाई करण्यात आली होती. डोजण वर्षात परमेश्वर महाराजांचे दर्शन मिळाले नसल्याने श्री दर्शनासाठी ग्रामीण भागातील वाडी -तांडे, खेडयापाड्यातुन सहपरीवारासह बैलगाडी, जीप, बस, रेल्वेसह मिळेल त्या वाहनाने भाविक - भक्त शहरात दाखल झाले होते.

महाशिवरात्रीचे औचीत्य साधुन मंदिर परीसरात बील्वपत्रे, मीठाई, फराळाचे साहीत्य तर मुख्य रस्त्यावर फळे- फुलांची सजलेली दुकाने व भक्तांच्या गर्दीमुळे उत्सवाचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. महाशीवरात्रीच्या दिवशी दिवसातुन ३ वेळा श्री परमेश्वराचे दर्शन घेण्याची प्रथा परंपरेनुसार चालत आली असुन, सकाळी दुपारी संध्याकाळी तिन्ही वेळा श्री परमेश्वराचे सगुनरुपी दर्शन वेगवेगळ्या रुपात होते, असे जुन्या - जानकार मंडळीतुन सांगितले जाते.

दरम्यान दुपारी महाशिवरात्रीच्या दिवशी हदगाव - हिमायतनगर तालुक्याचे  आ. माधवराव पाटील जवळगांवकर यांनी उपस्थीत होऊन, श्री परमेश्वराचे मनोभावे दर्शन घेऊन सर्वाना सुखी - समृद्धी ठेव अशी कामना श्री परमेश्वराकडे केली. तसेच उपस्थित सर्व भाविक भक्तांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या. दुपारी शीवलीलामृत ग्रंथाचे वाचन झाले व रात्री ८.३० वाजता हभप.शिवपुराणकार अभिमन्यू गिरी महाराज पैठणकर यांच्या कितर्नाचा कार्यक्रम संपन्न होताच शिवापती मंदिरातील शिव - पावर्तीचा अभीषेक सोहळा आणि त्यानंतर मंदिर संस्थानचे पदसीध्द अद्यक्ष तहसीलदार यांच्या हस्ते पुरोहीत कांतागुरु वाळके यांच्यासह पाच ब्राम्हण गुरुंच्या वेदशास्त्रींय मंत्रोच्चाराच्या जयघोषात अभीषेक, महापुजा व अलंकार सोहळा होईल.

दरम्यान आज संकल्पसून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मंदिराच्या वतीने फराळ, विश्वकर्मा समाजाच्या वतीने केळीचे वितरण तर बजरंग दलाच्या स्वयंसेवकांनी दुधाचे वितरण विविध संघटनांच्या वतीने करण्यात आले. यावेळी मंदिराचे विश्वस्त अध्यक्ष तहसिलदार डी.एन. गायकवाड, उपाध्यक्ष महावीसेठ श्रीश्रीमाळ, सदस्य लक्ष्मणराव शक्करगे, संभाजी जाधव, प्रकाश शिंदे, वामन बनसोडे, आनंता देवकते, मुलचंद पिंचा, राजाराम झरेवाड, माधव पाळजकर, सौ.लताबाई पाध्ये, सौ.लताबाई मुलंगे, श्रीमती मथुराबाई भोयर, शांतीलाल सेठ, एड.दिलीप राठोड, अनिल मादसवार, लिपीक बाबुरावजी भोयर, सुभाष शिंदे, संजय माने, उदय देशपांडे, परमेश्वर गोपतवाड, प्रकाश जैन, गोविंद गोडसेलवार, सोपान बोम्पीलवार, दिलीप शिंदे, परमेश्वर शिंदे, संतोष गाजेवार, प्रकाश साभळकर, राजू गाजेवार, राम नरवाडे, मारोती हेंद्रे, हनुसिंग ठाकूर यांच्यासह गावकरी मंडळी उपस्थीत होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.