कामारी येथील प्रितम शिरफुले सेट परीक्षेत उत्तीर्ण

हिमायतनगर प्रतिनिधी/- तालुक्यातील मौजे कामारी येथील प्रितम शिरफुले यांनी एकदम हालाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेऊन सेट परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत ते सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे मार्फत घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षेत रसायनशास्त्र विषयातून त्यांनी हे यश संपादन केले आहे 
     सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत विविध विषयासाठी प्राध्यापक होण्यासाठी पात्रता परीक्षा घेण्यात येतात त्या पात्रता परीक्षेत राज्यभरातून विविध विषयासाठी लाखो विद्यार्थी येतात त्यात केमिकल सायन्स या विषयात हिमायतनगर तालुक्यातील मोजे कामारी येथील प्रीतम भागवतराव शिरफुले यांनी हे यश संपादन केले आहे त्यांच्या या यशाबद्दल त्यांच्या मित्र परिवारांनी व काका, काकू ,आत्या यांनी व त्यांच्या शिक्षकांनी त्यांचे खूप खूप अभिनंदन करून त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.