धानोरा येथील प्रनय येणेकर याची गरूडझेप

          
हिमायतनगर प्रतिनिधी/तालुक्यातील धानोरा येथील प्रनय सुदर्शनराव येणेकर याचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (MBBS) नागपुर येथे पहिल्या फेरीत प्रवेश निश्चित झाला आहे. त्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने त्याचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले आहे.
हिमायतनगर तालुक्यातील मौजे धानोरा येथील सुदर्शनराव येणेकर यांचे चिरंजीव प्रनय सुदर्शनराव येणेकर याचा मेडिकल (MBBS) नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी पात्र ठरला आहे. त्यामुळे हिमायतनगर तालुक्यातील मौजे धानोरा गावची ओळख नांदेड जिल्ह्यासह विदर्भातही ओळख निर्माण झाली आहे.
ग्रामीण भागातील युवकाची निवड मेडिकलसाठी झाल्याचे समजताच मूळ गावी आल्यानंतर गावकऱ्यांच्या वतीने त्याचा सन्मान करून पुढील शैक्षणीक कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी संचालक नारायण देवकते, नितेश जैस्वाल, आण्णा शिंदे, गोरखनाथ ईटेवाड, देवीदास शिरडकर, वसंतराव येणेकर, मधुकरराव येणेकर, दयानंद मुठेवाड, लालता प्रसाद जैस्वाल, नाथाभाऊ खिराडे, दगडुजी काईतवाड बोरगडी, शैलेश पतलेवाड आदींसह अनेकांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.