आ. जवळगावकर यांच्या प्रयत्ना मुळे क्रिडा संकुलच्या जागेचा प्रश्न लागला मार्गी-- घारापुर येथील गायरान जागा देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

हिमायतनगर प्रतिनिधी(सोपान बोंपीलवार) 
 आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्या प्रयत्नाने क्रिडा संकुल च्या जागेचा प्रश्न मार्गी लागला असुन घारापुर येथील गायरान मधील 8 एकर जमिन देण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. अनेक वर्षांपासूनचा संकुल च्या जागेचा प्रश्न अखेर जवळगावकरांच्या प्रयत्नातून सुटला आहे. 
हिमायतनगर येथे तालुका क्रीडा संकुलांसाठी जागाच उपलब्ध होत नव्हती. गेल्या दोन वर्षापासून आ.जवळगावकर यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे अखेर तालुक्यातील घारापुर येथील गायरान मधील जागा उपलब्ध करून देण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेला क्रिडा संकुलनाचा प्रश्न अखेर आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्या प्रयत्नाने जागेचा प्रश्न मार्गी लागला आहे. 
    तालुका स्तरावर विविध खेळांच्या क्रिडा सुविधा निर्माण करण्याकरिता क्रिडा संकुल महत्त्वाचे होते. गेल्या काही वर्षांपासून जागेअभावी क्रिडा संकुल चा प्रश्न प्रलंबित होता. शासकीय ठिकाणी जागा पाहणी करून देखील अपुऱ्या जागेमुळे आजतागायत संकुल उभारता आले नाही. 
आ. जवळगावकर यांच्या मागणीची दखल घेत जिल्हाधिकारी यांनी घारापुर गायरान मध्ये असलेल्या गट क्रमांक- 16 मधील क्षेत्र 03 हेक्टर 20 आर गायरान जमीन तालुका क्रीडा संकुल उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत. तालुका हा मुख्य घटक धरून प्रत्येक तालुक्यात एक तालुका क्रिडा संकुल क्रिडा विकासाच्या कायम क्रिडा संकुलनाच्या कायम सुविधासह उपलब्ध करून देण्याच्या संकल्पनेस मान्यता दिली आहे. गेल्या काही वर्षांपासून शहरासह ग्रामीण भागातील खेळाडूंना क्रिडा संकुल नसल्यामुळे हेळसांड होत होती.तालुक्यातील खेळाडूंची मागणी लक्षात घेऊन . आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी सदरील क्रिडा संकुल साठी जागा पाहणी केली होती त्याच जागेची निवड शासनाकडून करण्यात आली आहे. घारापुर येथील आठ एकरातील गायरान जागेवर भव्य तालुका क्रिडा संकुल उभारण्यात येणार आहे. अखेर जवळगावकरांच्या प्रयत्नातून जागेचा प्रश्न सुटला आहे. 

जागा मिळाली क्रिडा संकुलही उभे करू..आ.जवळगावकर
तालुका क्रिडा संकुलसाठी जागाच नसल्यामुळे आजतागायत संकुल झाले नाही घारापुर येथील गायरान जागा देण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले असून जागेचा प्रश्न सुटला आहे. लवकरच क्रिडा संकुल इमारत उभारू असे आ. जवळगावकर यांनी बोलतांना सांगितले आहे

 





Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.