हिमायतनगर प्रतिनिधी/ हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात आज पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी त्यांनी वैद्यकीय यंत्रणाना शहरासह तालुक्यातील एकही बालक पोलीओ लसीपासून वंचित राहू नये. याची काळजी घेऊन लसीकरण करावे असे आवाहन केले. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ .डी.डी.गायकवाड, काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय माने, माजी तालुका अध्यक्ष जनार्दन ताडेवाड,ज्ञानेश्वर शिंदे, गजानन सुर्यवंशी,माजी नगराध्यक्ष अखिल भाई, योगेश चिलकावार, पंडित ढोणे, आदींसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी आ माधवराव पाटील जवळगावकर यांचा पुष्पगुच्छ देऊन डॉ गायकवाड यांच्या हस्ते स्वागत, सन्मान करण्यात आला. यावेळी ग्रामीण रुग्णालयातील सर्व अधिकारी कर्मचारी व गावकरी उपस्थिती होते.
सरसम प्राथमिक आरोग्य केंद्रातही बालकांना आ. जवळगावकर यांच्या हस्ते पोलीस लसीकरण देण्यात आले यावेळी येथील सर्व डाक्टर उपस्थित होते. तर
प्रा.आ. केंद्र सरसम अंतर्गत आरोग्य वर्धिनी उपकेंद्र जवळगाव येथे वयोगट 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकांना पल्स पोलिओ लसीकरणाचे दोन थेंब पाजून मोहिमेचे उदघाटन करताना माजी जिल्हा परिषद अध्यक्षा, शांताबाई जवळगावकर यांच्या हस्ते करुन बालकांना पोलिओ दिले आहे.
