हिमायतनगर प्रतिनिधी/ सरसम जिल्हा परिषद गटातील विकास कामे आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्या माध्यमातून मार्गी लागली असुन आणखी सरसम गावातील पादंन रस्त्यासह इतर कामे देखील होणार या सरसम जिल्हा परिषद गटातील गावांना निधी कमी पडणार नाही अशी ग्वाही माजी जि. प.सदस्य सुभाष राठोड यांनी व्यक्त केली आहे.
हिमायतनगर तालुक्यातील सरसम जिल्हा परिषद गटातील अनेक गावात आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्या विकास निधीतून सिमेंट रस्त्यांसह विविध कामे झाली आहेत. सरसम गावातही सरपंच अॅड अतुल वानखेडे यांच्या पुढाकाराने कामे सुरू करण्यात येणार आहेत.सरसम नवि आबादी येथुन जाणाऱ्या पादंन रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष राठोड यांनी सदरील पादंन रस्त्याची पाहणी करून ह्या पादंन रस्त्याचे काम आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्या माध्यमातून पंचायत समिती स्तरावरून लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. यासह सरसम जिल्हा परिषद गटातील इतर गावा अतंर्गत येणाऱ्या पादंन रस्त्याचे काम देखील मंजूर झाले असुन मोजमाप घेण्याचे काम प्रगतीपथावर आहे. लवकरच कांमाना सुरुवात होणार असल्याचे सुभाष राठोड यांनी सांगितले. सरसम सह या गटातील गावांच्या विकासासाठी निधी कमी पडणार नाही असेही राठोड यांनी सांगितले यावेळी गजानन सुर्यवंशी, ज्ञानेश्वर शिंदे, जनार्दन ताडेवाड,सरपंच अतुल वानखेडे, योगेश चिलकावार, लोणे, गोखले, विजय वाठोरे, यासह सरसम आबादी येथील नागरिक उपस्थित होते.
