हिमायतनगर तालूका मेडिकल असोसिएशन च्या अध्यक्ष पदी शंकरराव पाटील पळसपूरकर __________________________________

 
हिमायतनगर  प्रतिनिधी/हिमायतनगर तालुक्यातील सर्व मेडिकल धारकांची एक महत्वपूर्ण बैठक नुकतीच संपन्न झाली. यावेळी सर्वानुमते मेडिकल असोसिएशन चे  तालूका अध्यक्ष म्हणून  शंकरराव पाटील पळसपूरकर यांची निवड करण्यात आली आहे.
या वेळी नूतन अध्यक्ष  आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले  की,  मेडिकल धारकांच्या अडी अडचणी सोडविण्या करिता  आपण प्रयत्न करणार असून  संघटनेच्या माध्यमातून  जे काही प्रश्न शासन दरबारी  मांडावयाचे आहेत. ते वरिष्ठ पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली  मांडून ते  सर्वतोपरी सोडविण्याचे प्रामाणिक काम आपण करित राहणार आहोत,  संघटनेच्या सर्व पदाधिकारी यांना विश्वासात घेऊन संघटनेचे काम नेटाने पुढे नेण्याचा मानस  असून सर्व मेडिकल धारकानी  पुन्हा एकदा आपल्यावर विश्वास दाखवला, त्यांच्या विश्वासाला कदापी तडा जाऊ देणार नाही.  असे नूतन अध्यक्ष शंकरराव पाटील पळसपूरकर यांनी प्रस्तुत वार्ताहरांशी बोलतांना सांगीतले. 
यावेळी डाॅक्टर  असोसिएशन चे तालूका अध्यक्ष  डॉ.  राजेंद्र वानखेडे,   डाॅ.  शेषेराव  चव्हाण,  डॉ.  आनंद  माने,  डॉ.  प्रसाद  डोंगरगावकर, डाॅ. प्रसन्न  रावते,  डाॅ. विकास  शेवाळकर, डाॅ.  सुनिल ढगे, डाॅ.  दिगांबर  वानखेडे,  डाॅ.  मुक्कावार,  अमोल पेन्शनवार,  फेरोजखान, सरदार खान पठाण,  सतिश सूर्यवंशी,  प्रभाकर चव्हाण,  निळू  पवार,  बंडू  गायकवाड,   श्रीकांत माने, सौरभ जाधव , सलीम भाई,  अन्सारभाई, सचिन  नरवाडे,  संतोषराव देशमुख,  ओमप्रकाश शक्करगे,  राजू  तवर, अपर्णा तुप्तेवार,  सौरभ जाधव,  अफसर मौला साब,  अ.  बारी खान, विनोद  आरेपलू,  जय  राठोड,  कदम,  मनोज पाटील,  निलेश देवसरकर,  सौरभ शिरफूले,  राम  तवर , पवन सातव,  पंजाब मिराशे,  जितू  वानखेडे,  पुंडलिक  वानखेडे,  स्वप्नील कोमलवार,  संजय सुर्यवंशी,  विशाल रेखावार,  आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. 
मेडिकल असोसिएशन च्या अध्यक्ष पदी शंकरराव पाटील पळसपूरकर यांची  पुनच्छ एकदा निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन केल्या जात आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.