हिमायतनगर प्रतिनिधी/कारला सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान झाले असून सायंकाळी निकाल घोषित केला. यामध्ये शिवसेना तिसऱ्या अघाडीचे 11 तर कांग्रेस च्या 2 उमेदवारांचा विजय झाला आहे.
हिमायतनगर तालुक्यातील कारला सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत शिवसेना तिसऱ्या अघाडीचे
13 उमेदवार तर कांग्रेस पक्षाचे 13 असे एकूण 26 उमेदवार रिंगणात होते.रविवारी मतदान झाले सायंकाळी निकाल घोषित करण्यात आला आहे. जय केदारनाथ पॅनलचे 11 तर संत गाडगेबाबा शेतकरी विकास पॅनल चे 2 उमेदवार विजयी झाले आहेत.
या निवडणुकीवर शिवसेनेचे विशाल राठोड यांनी लक्ष केंद्रित करून विजयासाठी परिश्रम घेतले परंतु कांग्रेस पक्षाच्या पुढाऱ्यांनी दुर्लक्ष केले असल्याने पराभवाचा फटका बसला आहे. कारला ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेला पराभवाचा झटका बसल्यामुळे सोसायटी च्या निवडणुकीत शिवसैनिकांनी चांगलीच ताकद लावून निवडणुकीत विजय मिळवला आहे.या निवडणुकीत नाथा पाटील चव्हाण यांच्या नियोजनामुळे शिवसेना व तिसरी आघाडी एकवटली होती.
एकुण 11 जागेवर उमेदवार निवडण्यात यश आले आहे. कांग्रेस पक्षाच्या पॅनल स्वबळावर उभे होते.कांग्रेसच्या पॅनालचे डॉ गफार यांनी चानाक्ष पणे नियोजन केले असले तरी त्यांना दोन जागेवर समाधान मानावे लागले आहे.
शिवसेनेच्या नवनिर्वाचित संचालकाचे माजी आ.नागेश पाटील आष्टीकर, कृष्णा पाटील आष्टीकर ,विशाल राठोड,यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या यावेळी नाथा चव्हाण, सुनिल घोडगे,जांबुवंत मिराशे, गंगाराम पाटील चव्हाण,भुजंगराव रासमवाड,रामराव लुम्दे,भिमराव लुम्दे, गंगाराम रासमवाड, केशव रासमवाड, संभाजी सुर्यवंशी, राजेश ढाणके, संजय घोडगे,पंजाब कांबळे,लक्ष्मण ढाणके,संतोष रासमवाड, सौ. कांताबाई कदम, यांच्यासह शिवसैनिक व तिसऱ्या आघाडीच्या नवनिर्वाचित संचालक उपस्थित होते.
