हिमायतनगर प्रतिनिधी/ सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकांना चागंलाच जोर धरला असुन अनेक गावात सोसायटी बिनविरोध झाल्या असल्या तरी काही गावात स्थानिक पातळीवर निर्णय झाला नसल्यामुळे बिनविरोध न होता निवडणूक होत आहे. कारला व मंगरूळ सेवा सहकारी सोसायटी चा प्रचाराने चागंलाच जोर धरला प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. या दोन्ही गावच्या निकालाकडे कांग्रेस, शिवसेना, कोहळीकर गटाचे लक्ष लागून आहे.
हिमायतनगर तालुक्यातील कारला पी येथील सेवा सहकारी सोसायटी संस्था एकाच गावापुर्ती मर्यादित आहे. येथील सोसायटी करीता दोन पॅनल असुन कांग्रेस विरुद्ध शिवसेना असे दोन्ही पक्षाचे पॅनल आहे.तिसऱ्या अघाडीने देखील शिवसेने सोबत जुळवून घेतले आहे.त्यामुळे कांग्रेस प्रणीत संत गाडगेबाबा शेतकरी विकास पॅनल आहे यांची निशाणी नारळ आहे.तर शिवसेना प्रणित जय केदारनाथ बळीराजा असे पॅनल असुन यांची निशाणी कपबशी आहे. दोन्ही गटाचे एकुण 26 उमेदवार रिंगणात उतरले आहेत.याकरीता दि 20 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. येथील निकाल काय लागणार याची उत्सुकता लागून आहे. तर मंगरूळ सेवा सहकारी सोसायटी मध्ये दोन्ही गटाचा प्रचार रंगात असुन दोन्ही पक्षाच्या नेत्यांचे लक्ष लागून आहे. कांग्रेस, शिवसेना, कोहळीकर गटाचे लक्ष लागून आहे.
मंगरूळ सेवा सहकारी सोसायटीचे शेतकरी विकास पॅनल व बळीराजा शेतकरी विकास पॅनल यांच्या मध्ये लढत आहे. मंगरूळ सेवा सहकारी सोसायटी च्या निवडणुकीसाठी मतदान दि. 23 फेब्रुवारी रोजी होणार आहे. सध्या जि. प.च्या निवडणूका जवळ असल्यामुळे अनेक इच्छुक सोसायटीच्या निवडणुकीत लक्ष देऊन पॅनल आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. परंतु सदरील निवडणुक मात्र गावपातळीवर कार्यकर्त्यांच्या विश्वासाची असुन मतदार कुणाला पसंती देणार हे महत्त्वाचे आहे. दोन्ही सोसायटी च्या निकाल काय लागणार याची उत्सुकता सर्वांना लागून आहे.
