नगरपंचायत प्रशासन काळात कामांची दिरंगाई
हिमायतनगर प्रतिनिधी/गेल्या महिणा भरापासुन शहरातील अनेक भागातील स्ट्रीट लाईट बंद झाल्यामुळे नागरीकांना रात्रीच्या वेळी पुर्णपणे अंधार होत असल्याने घराबाहेर निघणे कठीण झाले आहे.पहिलेच शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.याबाबत नगरपंचायत प्रशासनास कळवून देखील नगरपंचायत चालढकल पणा करीत याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरीकांतुन होत आहे. हिमायतनगर नगरपंचायत च्या प्रशासन काळात शहरातील कामाकडे दुर्लक्ष केले जात आहे. शहरात ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य आहे. मुख्य रस्ते वगळता इतर भागात स्वछता मोहिमेचा पताच नाही अनेक भागात अस्वच्छतेमुळे रोगराई पसरत असल्याने नागरिक हिव तापाने हैराण आहेत.
कामे अत्यंत धिम्या गतीने होत असुन नगरपंचायत वरिष्ठांचे लक्ष नसल्याने कामांचा खोळंबा होत आहे.
शहरामध्ये मोठ्या प्रमाणात स्ट्रीट लाईट( सार्वजनिक लाईटचे पोल)या बबत अडचणी वाढत आहेत .त्याचे कारण हिमायतनगर नगरपंचायत प्रशासनाने प्रशासकीय कालावधीमध्ये शहरातील प्रभाग क्रमांक 9 व 10 यामध्ये संभाजी चौक, श्री गणेश चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक ,राम मंदिर ,गुजरी चौक ,जुना आठवडी बाजार लाईन या परिसरामध्ये मागील तीन ते चार महिन्यांपासून नगरपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे स्ट्रीट लाईट चालू बंद होत आहेत.
पण मागील 5 ते 7 दिवसा पासून संपूर्णपणे ही स्ट्रीट लाईट पूर्ण बंद आहे ह्यामुळे या परिसरातील लोकांना रात्री-अपरात्री बाहेर निघणे फिरणे अत्यंत कठीण झाले आहे यासंदर्भात नगरपंचायतीचे अभियंते यांना वारंवार सूचना करून देखील जाणीवपूर्वक कानाडोळा करीत आहेत. शहरातील बंद असलेले स्ट्रीट लाईट तात्काळ सुरू नाही केल्यास नगरपंचायत कार्यालयासमोर लाईट बलप फोडो आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा भाजपा अध्यक्ष आशीष सकवान, युवा मोर्चा अध्यक्ष राम सुर्यवंशी यांनी दिला आहे.
