हिमायतनगर प्रतिनिधी/ पैनगंगा नदीकाठावर असलेल्या कोठा ज. आणि तांडा परिसरातून येथील काही ट्रैक्टर चालकांनी हिमायतनगरच्या रेती व्यापाऱ्यांना धरून दिवसरात्र रेतीचा गोरखधंदा सुरु केला आहे. या भागाचे तलाठी, मंडळ अधिकारी यांच्याशी हातमिळवणी करून मोठ्या प्रमाणात रेतीची चोरी करून बांधकाम करणाऱ्या नागरिकांना ६ ते ७ हजार रुपये दराने विक्री करत आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर याबाबतची तक्रार दैनिक लोकपत्राचे पत्रकार दिलीप शिंदे यांनी नायब तहसीलदार अनिल तामस्कर यांच्याकडे करत कोठा परिसरातील रेतीचे ढिगारे जप्त करून संबंधित वाहनधारकावर कार्यवाही करावी अन्यथा जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांच्या निदर्शनास हि बाब आणून देऊ असा इशारा दिला आहे.
तालुक्यातील पैनगंगा नदीकाठावर असलेल्या मौजे कोठा, धानोरा, वारंगटाकळी परिसरातील रेती पेंडावरून राजकीय वरदहस्त असलेल्या रेती माफियाकडून अवैद्य रित्या रेतीचा उपसा करून धुमाकूळ घातला आहे. या सर्व प्रकाराला येथील तलाठी, मंडळ अधिकारी यांचा आशीर्वाद असल्याने रात्री अपरात्रीला आणि सुट्टीच्या दिवशी तर दिवसा रेतीची चोरी करून गोरगरिबांना व टोलेजंग इमारती उभारणार्यांना अव्वाच्या सव्वा दराने विक्री करून अल्पवधीत मालामाल होण्याचा प्रयत्न केला जात आहे. एवढेच नाहीतर येथे मोठ्या प्रमाणात रेतीचे साठेबाजी करून ठेवण्यात आली असल्याची माहिती या भागाचे जागरूक नागरिक सांगत आहेत.
खरे पाहता जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांनी हिमायतनगर तालुक्यातील पैनगंगा नदीकाठावरील रेती घाटावर गतवर्षी रेती माफियांनी घातलेला धुमाकूळ लक्षात घेता लिलाव करून गोर गरिबांना रेती कमी भावात उपलब्ध करून देणे क्रमप्राप्त आहे. परंतु आत्तापर्यंत एकही रेती घाटाचा लिलाव झाला नसल्याने पुन्हा एकदा रेती माफियांनी संबंधित सज्जाचे मंडळ अधीकारी, तलाठी यांना महिनेवारी हफ्ता ठरून आपल्या स्वतःच्या मालकीची पैनगंगा नदी असल्याप्रामणे रेती काढून साठेबाजी करत आहेत. याबाबत अनेकदा काही जागरूक नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यास सूचना दिल्यानन्तर कार्यवाही करण्यास टाळाटाळ चालवीत आहेत. त्यावरून या सज्जाचे अधिकारी देखील हप्तेखाऊ वृत्तीमुळे रेती माफियांच्या दावणीला बांधल्या गेल्या मुले रेती माफियांचा कोठा परिसरात उच्छाद सुरु असल्याचे चित्र दिसते आहे. याकडे जिल्हाधिकारी डॉ विपीन यांनी लक्ष देऊन लवकरात लवकर हिमायतनगर तालुक्यातील मंजुरी मिळालेल्या रेती घाटाचे लिलाव करावे आणि गोरगरिबांना अल्प दारात रेती उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली जात आहे.
