हिमायतनगर प्रतिनिधी/भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने दि. 26 जानेवारी रोजी तहसील कार्यालयासह शासकीय कार्यालय, ग्रामपंचायत, नगरपंचायत, शाळेत ध्वजारोहण करून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला आहे.
हिमायतनगर तहसील कार्यालयातील ध्वजारोहण तहसीलदार डि. एन. गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी नायब तहसीलदार राठोड, तामसकर, होते. पंचायत समिती कार्यालयाचा ध्वजारोहण पं. स. सभापती आडे, गटविकास अधिकारी आंदेलवाड यांच्या उपस्थितीत पार पडला आहे. नगरपंचायत चा ध्वजारोहण मुख्याधिकारी यांच्या हस्ते झाला, कृषी उत्पन्न बाजार समिती चा ध्वजारोहण सभापती डॉ प्रकाश वानखेडे यांच्या हस्ते झाला आहे. तर तालुक्यातील ग्रामपंचायत मध्ये ध्वजारोहण साजरा करण्यात आला आहे. सवना येथील ग्रामपंचायत चा ध्वजारोहण सरपंच परमेश्वर गोपतवाड यांच्या हस्ते करण्यात आला आहे.
कारला पी येथील ध्वजारोहण ग्रा. पं. सदस्य सोपान बोंपीलवार यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी सरपंच गजानन पाटील कदम, सदस्य रामेश्वर यमजलवाड, गजानन मिराशे पाटील, दत्ता चितंलवाड, अॉपरेटर नागसेन गोखले, रोजगार सेवक कैलास कांबळे, ग्रा. प.सेवक साहेबराव घोडगे, उपस्थित होते. तर सेवा सहकारी सोसायटी चा ध्वजारोहण अशोक आचमवाड यांच्या हस्ते करण्यात आला आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा ध्वजारोहण शालेय समिती अध्यक्ष उत्तम कांबळे, उपाध्यक्ष शिवाजी एटलेवाड यांच्या हस्ते करण्यात आला आहे.
यावेळी मु. अ. बुरकुले, विठ्ठल सुर्यवंशी, लक्ष्मण चितंलवाड, जांबुवंत मिराशे, भिमराव कांबळे, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. पळसपुर येथील ग्रामपंचायत मध्ये महामानवाच्या प्रतिमेचे पुजन करुन ध्वजारोहण सरपंच मारोती वाडेकर यांच्या हस्ते करण्यात आला आहे. उपसरपंच गजानन देवसरकर, ग्रामसेवक कासटवार यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व नागरिक उपस्थित होते. पळसपुर जिल्हा परिषद शाळेचा जिल्हा परिषद शाळेचा ध्वजारोहण शालेय समिती अध्यक्ष दिगाबंर पाटील वानखेडे यांच्या हस्ते करण्यात आला आहे. मु. अ. विनायक हूंबे, व शिक्षक उपस्थित होते. वारंगटाकळी येथील ग्रामपंचायत चा ध्वजारोहण सरपंच दयाळ गिरी यांच्या हस्ते करण्यात आला आहे यावेळी ग्रामसेवक काळे, ग्रामपंचायत सदस्य दता पुपलवाड व आदींची उपस्थिती होती.
धानोरा ग्रामपंचायत चा ध्वजारोहण सौ. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ग्रामविकास अधिकारी बालाजी पोगुलवाड, गणेशराव शिंदे यांच्यासह सदस्य ग्रामस्थांची उपस्थिती होती. यासह तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत, शाळा, विद्यालयात ध्वजारोहण करून प्रजासत्ताक दिन उत्सवाच्या वातावरणात साजरा करण्यात आला आहे.
