मनुष्याने जिवनात संताच्या विचाराने वागले पाहिजे-- ह .भ.प.कृष्णा महाराज बोंपीलवार


हिमायतनगर प्रतिनिधी/..
आई वडिलांच्या बरोबरच संताचेही संस्कार नविन पिडिवर होणे आवश्यक आहे. यातुनच तरूण पिढीला चांगले संस्काराचे धडे मिळण्यास मदत होते. आज मनुष्यास मन शांती नाही भौतिक सुखाच्या मागे लागल्याने  आपले मानसिक स्वास्थ्य हरवून बसला असून याकरिता प्रत्येक मनुष्याने संतांचे विचार आगींकारने महत्त्वाचे असुन त्यांच्या विचाराने वागले पाहिजे असे किर्तन सेवेत ह. भ. प.कृष्णा महाराज बोंपीलवार कार्लेकर यांनी केले आहे. 

       कारला येथे गेल्या 12 वर्षापासून कृष्णा मंदिराचा अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. शुक्रवारी या सप्ताहातील पाचव्या दिवसाची सेवा ह. भ. प. कृष्णा महाराज बोंपीलवार कार्लेकर यांची होती. 

या किर्तन सेवेत ते म्हणाले की संत तुकाराम महाराजांनी दिलेला उपदेशाचे प्रत्येकांनी पालन केले पाहिजे. जिवनात त्यांच्या विचाराने वागले तर जिवनाचे कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. संत तुकाराम महाराजांनी जी शिकवण दिली ती आचरणात आणल्यास प्रत्येकजण सुखी समृद्ध होईल सप्ताहाच्या निमित्ताने या आपली आत्मशुध्दी होते. वाईट विचार सोडून चांगले विचार आत्मसात केले पाहिजे यासाठी दरवर्षी आयोजित या अखंड हरिनाम सप्ताहातुन समाजाला दिशा देण्याचे काम होत आहे. अशा सप्ताहाचे आयोजन सर्वत्र होने गरजेचे असल्याचे कृष्णा महाराज बोंपीलवार यांनी सांगितले आहे. या किर्तन सेवेत टाळ आणि मृदगांची साईनाथ राहुलवाड, भगवान गुफंलवाड,सचिन बोंपीलवार , गायनाचार्य ज्ञानेश्वर महाराज बोटेवाड, मारोती महाराज राहुलवाड, आनंद गोसलवाड, रामदास बोंपीलवार, माधव महाराज मिराशे, रामराव लुम्दे, उत्तम पाटील कदम, संभा ताटेवाड, यांच्यासह महिला,पुरुष भक्तांची उपस्थिती होती. 



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.