सलामी तिरंगा" या मोहिमे अंतर्गत प्रशासकीय अधिकाऱ्यांचा झाला सन्मान..
हिमायतनगर प्रतिनिधी/ युनियन बँकेत शेतकऱ्यांची कामे वेळेत पुर्ण करून बँकेच्या ग्राहकांना सन्मानाने आपलसं करीत या बँकेचे कृषी अधिकारी लक्ष्मण गोपतवाड यांनी आपले कर्तव्य योग्य बजावल्यामुळे बँकेकडून त्यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे.
तालुक्यातील चळवळीचे गांव म्हणुन सर्वत्र परिचित असलेले मौजे सवना ज. येथील सरपंच तथा जेष्ठ पत्रकार, मा. सभापती परमेश्वर गोपतवाड यांच्या प्रमाणे सामाजिक जाणीव ठेवत ग्रामीण भागातील तळागाळातील जनतेच्या प्रश्नासाठी नेहमी अग्रेसर असतात त्याच प्रमाणे वडिलांच्या सामाजिक तेचा वसा आपल्या कर्तव्यातुन देखील करून दाखविल्याचे चिरंजीव ग्रामीण भागात पहिल्या तीन क्रमांकावर असलेल्या युनियन बॅंकेचे(पुर्व आंध्रा बॅंक) चे कृषी अधिकारी लक्ष्मण गोपतवाड यांनी ग्रामीण भागात टाॅप नंबर तिने मध्ये ऐऊन बॅंकेचा पुरस्कार मिळाला आहे.
नुकताच "कृषी व्यवसाय" विभागातर्फे "सलामी तिरंगा" मोहिमेअंतर्गत शेतकऱ्यांचे कामे वेळेवर पारदर्शक करून, त्यांना वेळोवेळी मदत केल्या बद्दल, युनियन बँकेच्या प्रशासनाने त्यांच्या कामगिरीवर बद्द्ल, त्यांना यावर्षीची उत्कृष्ट बॅंक अधिकारी म्हणून पुरस्कार प्रदान करुन त्यांचा सन्मान केला. या त्यांच्या अलौकिक कार्याचे अभिनंदन हदगांव- हिमायतनगर चे विद्यमान आमदार माधवरावजी पाटील जवळगावकर, सुभाष दादा राठोड, विकास पाटील देवसरकर, सरपंच परमेश्वर गोपतवाड, मा. संचालक रफीक शेठ, अखील शेठ, डॉ. प्रकाश वानखेडे, पत्रकार प्रकाश मामा जैन, अनिलभाऊ मादसवार, सोपान बोपिंलवार, संरपंच मारोती वाडेकर, पत्रकार मारोती आकलवाड, उपसंरपंच प्रतिनिधी सोनबा राऊत, सिद्धार्थ राऊत, सर्व सवना ज. चे ग्रामपंचायत सदस्य, तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव आदिनी भ्रमणध्वनीवर लक्ष्मण गोपतवाड यांचे अभिनंदन केले आहे.
