मंजूर झालेले पत्रकार भवन कुणी पळविले याचा शोध पत्रकारांनी घ्यावा आ. जवळगावकर

 


 

 हिमायतनगर प्रतिनिधी/शहरात ग्रामीण भागातून येणाऱ्या पत्रकार बांधवांसाठी पंधरा लाख रुपयांचा निधी मंजूर करून भवनाच्या कामाचे भुमिपुजन देखील करण्यात आले होते. परंतु गेल्या नगरपंचायत च्या अडिच वर्षाच्या काळात मंजूर झालेले पत्रकार भवन कुणामुळे वापस गेले निधी परत कोणी केला याची सत्यता पत्रकारांनी घ्यावी. त्यांनी पत्रकार भवन पळविले तरी हरकत नाही पुन्हा पत्रकार भवन उभे करून देणार असल्याचे आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी सांगितले आहे. 


      हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिर सभागृहात दि.०९ जानेवारी रोजी संपन्न झालेल्या दर्पण दिन कार्यक्रमाच्या मंचावरून बोलत होते. यावेळी मंचावर जेष्ठ नेते लक्ष्मणराव शक्करगे, मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष गोविंद गोडसेलवार, जेष्ठ पत्रकार परमेश्वर गोपतवाड, प्रकाश जैन,अनिल मादसवार,अशोक आनगुलवार,गंगाधर वाघमारे, मारोती वाडेकर,परमेश्वर शिंदे, मनोज पाटील, दिलीप शिंदे, धोडोंपत बनसोडे, दाऊ गाडगेवाड, 

यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच अनाथांची माय स्व. सिंधुताई सपकाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर पत्रकार बांधवांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुछ व सन्मानपत्र देऊन आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.  

   याप्रसंगी पुढे बोलताना आ.माधवराव पाटील जवळगावकर म्हणाले कि पत्रकार हा समाजाचा फार महत्वाचा घटक आहे, पत्रकारांच्या लेखणीत एवढी ताकत असुन आमच्या देखील चुका आपण लेखणीच्या माध्यमातून मांडुन आम्हालाही त्याची जाणीव करून देत पत्रकारांनी सत्यता हे जनतेपर्यंत पोचविण्याचे काम केले पाहिजे प्रथम नगरपंचायत वर कांग्रेस पक्षाची सत्ता येताच पत्रकार भवनासाठी पंधरा लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता.सदरील भवनाची जागा निश्चित करून भुमिपुजन झाले होते.परंतु नंतर अडिच वर्षाच्या कार्यकाळात पत्रकार भवनाचा निधी परत करून भवन होऊ दिले नाही याचा शोध पत्रकारांनी घेतला पाहिजे .पहिला पत्रकार भवनाचा निधी त्यांनी परत केला तरी हरकत नाही पुन्हा येथे पत्रकार भवन उभे करून देणार असल्याचे जवळगावकर यांनी सांगितले. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विकास पाटील, माजी जी.प.सदस्य सुभाष दादा राठोड, समद खान, माजी कृउबा संचालक रफिक सेठ,गजानन सुर्यवंशी, सुभाष शिंदे, काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय माने, प्रथम नगराध्यक्ष अ. अखिल अ. हमीद, माजी तालुकाध्यक्ष जनार्धन ताडेवाड, गोविंद बंडेवार, हनीफ सर, फेरोज कुरेशी, पंडित ढोणे, आदींसह काँग्रेस कार्यकर्ते, तालुक्यातील शहर व ग्रामीण भागातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.    

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.