धानोरा सोसायटीच्या निवडणुकीत 7 जागा मिळवत कांग्रेस गटाचे वर्चस्व तर विरोधी गटाला 6 जागा

 गणेशराव शिंदे विरूद्ध रवि शिंदे यांच्यात लढत  अखेर ईश्वर चिटीतुन गणेशराव शिंदे विजयी

 

 


हिमायतनगर प्रतिनिधी/सेवा सहकारी संस्था धानोरा (ज) सोसायटी  निवडणूकीत  मोठ्या अटीतटीची झाली असून या निवडणुकीसाठी 9 जानेवारी रोजी मतदान होऊन सायंकाळी निकाल घोषित झाला  आहे. शिंदे गटातील 7 तर देवकते गटाच्या 6 जागा मिळाल्या आहेत. तर विद्यमान सरपंच मताधिक्याने निवडल्या असल्या तरी गणेशराव शिंदे यांना मात्र विरोधी गटातील उमेदवारांने चागंली लढत दिल्यामुळे शिंदे यांचा विजय इश्वर चिटीतुन झाला आहे. 

हिमायतनगर तालुक्यातील धानोरा सोसायटीच्या निवडणूक निकाला कडे सर्वांचे लक्ष लागून होते. या निवडणूकीत दोन गटातील  26 उमेदवार रिंगणात होते. देवकते व शिंदे गटात चुरसिची लढत झाली आहे. देवकते गटाकडून नितेश जैस्वाल, नारायण देवकते, भाऊराव तुळशे, जयवंतराव ऐणेकर, निलाबाई जैस्वाल, मिलींद जाधव, या 6 उमेदवारांचा विजय झाला आहे तर शिंदे गटातील गणेशराव शिंदे, शाम गडमवाड, रामराव तुळशे, शामराव तुळशे, मारोती तुळशे, शंकर जाधव, प्रभावती शिंदे, या 7 उमेदवार विजयी झाले आहेत . 

विशेष म्हणजे गणेशराव शिंदे यांच्यासह पाच उमेदवारांना समान मते पडल्यामुळे त्यांचा विजय इश्वर चिटीतुन झाला आहे. गणेश शिंदे यांच्या पाठिशी खंबीरपणे पडद्याआड विजय वळशे पाटील तर शिवसेनेचे बळीराम देवकते यांच्या पाठिशी कांग्रेस पक्षाच्या एका गटाने खंबीरपणे साथ दिली आहे. या निवडणुकीत विद्यमान सरपंच प्रभावती शिंदे ह्या मताधिक्याने निवडल्या आहेत. कांग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित संचालकांचा शिरपली येथे शिवाजी पाटील जाधव यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या आहेत. 


  सोसायटीवर कांग्रेस गटाचा विजय- संचालक गणेशराव शिंदे

धानोरा सोसायटीची निवडणुक अटीतटीची झाली असली तरी हि निवडणुक आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्या नेतृत्वाखाली लढविण्यात आली आहे. येथील जनता हि कांग्रेस पक्षाच्या पाठिशी आहे. गावातील काही स्वतला कांग्रेस पक्षाचे एकनिष्ठ म्हणून घेत असले तरी त्यांनी पक्षाशी एकनिष्ठता ठेवलीच नाही त्यांना जवळगावकर समर्थक म्हणून घेण्याचा अधिकार देखील नाही त्यांनी पक्षाला डावलून निवडणुक लढवली असली तरी सोसायटीच्या निवडणुकीत कांग्रेस पक्षाचे बहुमत असुन 7 उमेदवार निवडून आले आहेत.नवनिर्वाचित संचालकांचे आ. जवळगावकर यांनी अभिनंदन केले आहे. येणाऱ्या काळात कांग्रेस पक्षाचे एकनिष्ठ कोण आहेत हे समजणार असल्याचे संचालक गणेशराव शिंदे यांनी सांगितले आहे. 


       

आम्ही जवळगावकरांचेच समर्थक...संचालक नितेश जैस्वाल


गेल्या काही वर्षांपासून कांग्रेस पक्षांशी एकनिष्ठ राहून पक्षासाठी प्रत्येक निवडणुकीत निष्ठेने काम केले. कुठल्याही पदाची अपेक्षा न बाळगता आजपर्यंत कांग्रेस पक्षाचे काम केले . धानोरा सेवा सहकारी सोसायटी मध्ये दोन गट होते. त्यामुळे गावपातळीवर देवकतें ह्या गटामधुन आम्ही निवडणुक लढवली असली तरी गावपातळीवर शिंदे यांना वळशे पाटील गट चालत असल्याने  आम्ही सुध्दा नाविलाजा ने असे जुळवून घेतले  आ. माधवराव पाटील जवळगावकर व कांग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असुन यापुढे  देखील राहणार असल्याचे नवनिर्वाचित संचालक नितेश जैस्वाल यांनी सांगितले. 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.