हिमायतनगर प्रतिनिधी/
बुधवारी
परमेश्वर मंदिर सभागृहात राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त राजमाता
जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात आले आहे.
हिमायतनगर परमेश्वर मंदिर सभागृहात राजमाता जिजाऊ यांच्या जयंती
निमित्ताने मॉ. जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन
करण्यात आले यावेळी रामभाऊ सुर्यवंशी, विठ्ठल ठाकरे, विलास वानखेडे, गजानन
हारडपकर यांच्यासह अनेकांनी पुष्पगुच्छ अर्पण करून अभिवादन केले.
पळसपुर ग्रामपंचायत मध्ये राजमाता जिजाऊंना अभिवादन
हिमायतनगर
तालुक्यातील पळसपुर ग्रामपंचायत कार्यालयात राजमाता जिजाऊ यांच्या जयंती
निमित्ताने प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी
काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील पतंगे, सरपंच मारोती वाडेकर, उपसरपंच गजानन
देवसरकर, शालेय समिती अध्यक्ष दिगांबर पाटील वानखेडे, तंटामुक्तीचे अध्यक्ष
वसंत पाटिल वानखेडे, माजी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा ग्रा. पं. सदस्य नागोराव वानखेडे, ग्रा. पं. सदस्य संजय वानखेडे, रघुनाथ वानखेडे, सतीष वाडेकर वानखेडे, पत्रकार दाऊ गाडगेवाड, व ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह शिवप्रेमी
बांधवांची उपस्थिती होती.
