ग्रामचैतन्य श्रमदान अभियानात सहभागी झालेल्या सिरजंनी गावच्या युवकांचा भव्य सत्कार



हिमायतनगर प्रतिनिधी| राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून ग्रामचैतन्य श्रमदान अभियानात सहभागी झालेल्या ८२ युवकांचा हिरण्यगर्भ बहुद्देशीय प्रतिष्ठान सिरंजनी कडून सत्कार करण्यात आला.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हिरण्यगर्भ बहुद्देशीय प्रतिष्ठान कडून युवादीन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला आहे. मागील काही महिन्यांपासून सिरंजनी येथे युवा नेते पवन करेवाड यांच्या नेतृत्वाखाली युवकांमार्फत गावात ग्रामचैतन्य श्रमदान अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात मोठ्या संख्येने युवक श्रमदानातून करून गाव स्वच्छ सुंदर केले आहे. या स्वच्छता अभियानाने गावात स्वच्छतेचे संदेश देत गावात एक अद्भुत चित्र निर्माण झाले आहे. आपल्या या सेवाभावी वृत्तीने सिरंजणी येथील युवकांनी अख्ख्या नांदेड जिल्ह्य़ात युवकांसाठी आदर्शत्व उभे केले आहे.

या सर्व युवकांना प्रेरणा देण्यासाठी त्यांच्या आदर्श कामाची दखल घेत त्यांना या कार्यक्रमाचे आयोजन दिनांक ११ जानेवारी सकाळी १० वाजता सिरंजनी येथे "सन्मानपदक" देऊन गौरव करण्याचा निर्णय हिरण्यगर्भ बहुद्देशीय प्रतिष्ठाणने घेतला होता. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नारायण गंगाराम करेवाड हे होते तर, प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सतिश शेट्टी (चेअरमन, तुंगा ग्रुप ऑफ हॉस्पिटल मुंबई ), डॉ. हेमल बार्छा ( संस्थापक, CURVES & SMILES आरोग्य संस्था मुंबई ), डॉ. गुरुप्रसाद शेट्टी ( कान, नाक घसा तज्ञ मुंबई), प्रा. मा.न. जाधव सर, राष्ट्रपाल वाठोरे (आर्मी)
यांची उपस्थिती होती.

तालुक्यातच नाही तर पुर्ण जिल्ह्यात गावाचे नाव आदर्शत्वाकडे नेणाऱ्या या आदर्श युवकांच्या संघाचा पुर्ण गावाला अभिमान आहे. असे यावेळी बोलतांना युवा नेते पवन करेवाड यांनी सांगितले. प्रा.मा. न. जाधव सर, शेट्टी सर, डॉ. किरण करेवाड, रामभाऊ सूर्यवंशी यांनी युवकांना प्रेरणा देऊन मार्गदर्शन केले.
भाटे सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रत्येक युवकांवर विनोदी कवीता करून त्यांची मने जिंकली.
तर आभार प्रदर्शन गणेश कुरमुलवाड यांनी केले. हे स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष असल्याने जिजाऊ मासाहेब, स्वामी विवेकानंद यांच्यासोबतच भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर शेवटी राष्ट्गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.