सेवा सहकारी सोसायटी च्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असुन अनेक गावच्या निवडणुका होत असल्या तरी गेल्या पन्नास वर्षापासूनची परंपरा कायम राखत आजही आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली जवळगाव सेवा सहकारी सोसायटी बिनविरोध झाली असुन विस वर्षापासून जयवंत पवार यांच्याकडे चेअरमन पद असुन व्हाईस चेअरमन म्हणून रंगराव देवसरकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
हिमायतनगर तालुक्यात 22 सेवा सहकारी सोसायटी पैकी 12 सोसायटी चा निवडणूक कार्यक्रम सुरू असुन त्यापैकी पाच सेवा सहकारी सोसायटी बिनविरोध झाल्या आहेत.
जवळगाव सेवा सहकारी सोसायटी सुरुवाती पासून माजी आ.कै.निवृत्ती पाटील जवळगावकर यांनी बिनविरोध केली.
तिच परंपरा कायम राखत आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज तब्बल पन्नास वर्षांनी येथील सोसायटी बिनविरोध करण्यात आली आहे.तर या सोसायटीचे चेअरमन पद हे विस वर्षापासून एकाकडे आहे यावेळी देखील चेअरमन जयवंत पवार तर व्हाईस चेअरमन पदी रंगराव देवसरकर यांची निवड झाली आहे तर संचालक म्हणून आ. माधवराव पाटील पवार, राजाराम कदम, भगवान पवार, मंगेश सुर्यवंशी, बाबाराव पऊळ, नामदेव लोसरवार, लालू सातलवाड, तुकाराम बंडे, माधव वाघमारे, सौ.कुसुमताई डोडारणे, सौ. कमलाबाई पुलेवार यांची निवड झाली आहे. जवळगाव सेवा सहकारी सोसायटी मध्ये 10 गावे असुन एकुण 13 संचालकांचे मंडळ आहे. गेल्या पन्नास वर्षापासूनची परंपरा कायम ठेवत यावेळी देखील जवळगाव सेवा सहकारी सोसायटी बिनविरोध झाल्याबद्दल संचालक मंडळाचे कौतुक होत आहे. जवळगाव सेवा सहकारी सोसायटी अंतर्गत येणाऱ्या गावच्या मतदारांचा व संचालकांचा विश्वास आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी पुर्ण करुन निवडणूक बिनविरोध केली आहे. नवनिर्वाचित संचालकांचे जि. प.च्या माजी अध्यक्षा शांताबाई पवार,आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
