हिमायतनगर प्रतिनिधी/कोरोणा संसर्गजन्य महामारीच्या पाश्र्वभूमीवर शासनाने शाळा, महाविद्यालय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे लाखो विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होण्याबरोबर त्यांचे अक्षरशः जिवन उद्ध्वस्त होत आहे. कोरोणाच्या नियमाचे पालन करून शाळा, महाविद्यालय व तसेच खाजगी शिकवणी चालू करावे. अशी मागणी भारतीय जनता पार्टी हिमायतनगर तालूका शाखेच्या वतीने करण्यात आली आहे.
तालूका दंडाधिकार्यामार्फत शासनाला सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाने कोरोणा संसर्गजन्य महामारीच्या पाश्र्वभूमीवर शाळा , महाविद्यालय बंद करण्याअसूनचा निर्णय घेतला. हा निर्णय अतिशय दुर्दैवी ठरत शालेय विद्यार्थी, व महाविद्यालयीन विद्यार्थ्याचे अतोनात नुकसान होत आहे. व तसेच खाजगी शिकवणी घेणारे असे अनेक शिक्षक व माहेवारी अल्प पगारावर काम करणारे खाजगी शिक्षक त्यांचे अर्थिक नुकसान होत असून त्यांचेवर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने या बाबतीत फेरविचार करून शाळा, महाविद्यालय व तसेच खाजगी शिकवणी चालू करूण विद्यार्थ्याचे भवितव्य घडविण्याचे शैक्षणिक शाळा महाविद्यालय चालू करावे. अशी मागणी तालूका अध्यक्ष आशिष सकवान, कांतागुरू वाळके, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष राम भाउ सुर्यवंशी, अनु जाती मोर्चाचे तालुकाध्यक्ष दत्ता शिराणे, शहराध्यक्ष खंडू चव्हाण, सुभाष माने, हिदायतखान, विनायक ढोणे, राम जाधव ,बालाजी ढोणे, सचिन कोमावार, अजय स्कूल वार, राजू चार्लेवाड, अनिल फाळके, बालाजी पोतरे, नंदू बोंबींलवार, गंगाधर मिरजगावे, सुरज चिंतावार, परमेश्वर सुर्यवंशी, विनोद दुर्गेकर, हनुसिंग ठाकूर, अमोल माने, प्रमोद भुसाळे, अजय जाधव, महेश काळे, प्रशांत ढोले आदिंनी केली आहे.
