गोदावरी फाऊंडेशन च्या वतीने कार्यशाळेच्या माध्यमातून राष्ट्रीय स्टार्टअप दिवस साजरा

नांदेड प्रतिनिधी/  खासदार हेमंत पाटील आणि गोदावरी फाउंडेशनच्या अध्यक्ष राजश्री पाटील यांच्या पुढाकाराने व फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज आणि प्रोफेशनल्स ह्या भारतीय उद्योगांसाठी कार्यरत असलेल्या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने भारतातील स्टार्टअप उद्योगांसाठी ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करून राष्ट्रीय स्टार्टअप दिवस साजरा करण्यात आला . 
                  देशातील उद्योग व्यवसायाना चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून स्टार्टअप योजनेला सुरवात करण्यात आली त्यानुसार देशात उद्योग व्यवसाय वाढीस लागले आहेत देशाच्या अनेक भागात प्रसिद्ध असलेले उत्पादनांना जागतिक बाजरपेठ उपलब्ध झाली आहे याच अनुषंगाने २०२२ पासून देशात राष्ट्रीय स्टार्टअप दिवस १६ जानेवारी रोजी साजरा करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर खासदार हेमंत पाटील आणि गोदावरी फाउंडेशनच्या अध्यक्ष राजश्री पाटील यांच्या पुढाकारातून ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला सीए मयूर मंत्री यांनी प्रमुख मार्गदर्शन केले सोबतच यावेळी बोलताना FIIP संस्थेचे संस्थापक नवनाथ देवकरआपले यांनी आपले विचार व्यक्त केले ते म्हणाले कि, प्रामुख्याने नवीन उद्योजकाला व्यवसायात येत असताना त्याच्या नोंदी करणे वेगवेगळ्या शासकीय करांच्या वैधानिक अनुपालन करणे आदी विषय अधिक महत्त्वाचे असतात त्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेण्यात यावा .यावेळी गोदावरी फाउंडेशनचे सचिव धनंजय तांबेकर यांच्यासह अनेक उद्योजकांनी आपले विचार व्यक्त करून समस्या मांडल्या . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय चंदन यांनी केले या कार्यक्रमात अनेक उद्योजकांनी सहभाग नोंदविला होता . मयूर मंत्री यांनी उद्योजकांच्या अनेक समस्या आणि त्यावरचे उपाय योजना याबाबत या कार्यक्रमांमध्ये मार्गदर्शन केले . शंतनू रस्ते यांनी आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता केली

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.