हिमायतनगर प्रतिनिधी/...ग्रमीण जनतेला आगामी काळात पाणी टंचाई भासणार नाही. याची आतापासूनच काळजी घेणे गरजेचे असून आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी जागरूक पणे तसे प्रयत्न चालविले आहेत. आमदार जवळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण काम करीत असतांना जनतेला पाणी टंचाई भासणार नाही. याची काळजी आतापासूनच प्रशासकीय यंत्रणेने घ्यावी. असे माजी जि. प. सदस्य सुभाष दादा राठोड यांनी पाणी टंचाई आराखडा बैठकीत उपस्थित ग्रामसेवक यांना केले .
हिमायतनगर येथील पंचायत समिती कार्यालयात सोमवारी दा. १७ रोजी आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी संभाव्य पाणीटंचाई आढावा बैठक आयोजित केली होती. परंतू तब्येतीच्या कारणाने आमदार माधवराव पाटील जवळगावकर हे बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीत पहिल्यांदाच पंचायत समितीच्या सभापती सौ. सुरेखाताई बापूराव आडे यांच्या अध्यक्षतेखाली व तसेच माजी जि.प.सदस्य सुभाष राठोड यांच्या प्रमूख उपस्थित संभाव्य पाणी टंचाई आढावा बैठक पार पडली. आमदार जवळगावकर यांनी बैठकीची सुत्रे सुभाष राठोड यांच्या हाती दिली होती. या वेळी पुढे बोलतांना सुभाष राठोड म्हणाले की, ग्राम पंचायत स्तरावरील सर्व सन्माननीय ग्राम पंचायत सदस्य व गांवकर्याच्या सहकार्यातून गावाचा सर्वागीण विकास साधावा. सरपंच व ग्राम सेवक यांनी आपले कर्तव्य जागरूक पणे पार पाडून गावाला मुबलक पाणी साठा उपलब्ध कसा करता येईल. याकडे लक्ष द्यावे. तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर हे ग्रामीण जनतेच्या अडीअडचनी सोडविण्यासाठी तत्परतेने काम करीत आहेत. आहोरात्र काम करणारा नेता आपल्याला आमदार जवळगावकर यांच्या माध्यमातून लाभला आहे. आपण सर्व ग्राम सेवक पंचायत स्तरावरील सर्व प्रशासकीय यंत्रना आपले कर्तव्य जागरूक पणे जनहितार्थ पार पाडावे. असे अवाहन माजी जि.प. सदस्य सुभाष राठोड यांनी केले आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पाणी पुरवठ्याचे उपकार्यकारी अभियंता भोजराज यांनी केले. तर गटविकास अधिकारी मयुर अंदेलवाड यांनी सखोल असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विस्तार अधिकारी बच्चेवार यांनी केले. तर आभार व्यंकटेश दमकोंडवार यांनी मानले. यावेळी तालूका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष विकास पाटील देवसरकर, मु. अ. गजानन सुर्यवंशी, बालविकास प्रकल्प अधिकारी कैलास बळवंत, विस्तार अधिकारी साईनाथ चिंतावार, बापूराव आडे,पं.स. सदस्या सौ. मायाताई दिलीप राठोड, प्रभारी गटशिक्षण अधिकारी माधव वानोळे, नितेश जैस्वाल, आदींसह अधिकारी,कर्मचारी, ग्रामसेवक यांची उपस्थिती होती.
