हिमायतनगर प्रतिनिधी/..कारला
दरवर्षी प्रमाणे यावर्षी श्री कृष्ण मंदिराच्या अखंड हरिनाम सप्ताह व
ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असुन या सप्ताहाची सुरूवात
3 जानेवारी पासून होणार आहे. 10 जानेवारी रोजी काल्याच्या कीर्तनाने
सांगता होणार असुन.पंचक्रौशीतील भाविकांनी या सप्ताहाचा लाभ घ्यावा असे
आवाहन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
हिमायतनगर तालुक्यातील कारला ग्रामस्थांच्या सहकार्याने श्री कृष्ण
मंदिर चा अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात
आले असुन या सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रम सकाळी 5 ते 6 काकडा, 7 ते 10
ज्ञानेश्वरी पारायण, सांयकाळी 4.30 ते 6 हरिपाठ, 8 ते 10.30 हरिकीर्तन
असणार आहे. सप्ताहातील किर्तनकार ह.भ.प.वैशाली देवराये पाटील पवनेकर, ह. भ.
प. गजानन माऊली तामसेकर, ह. भ. प. माधव महाराज बोरगडीकर, ह. भ. प.
महारुद्र महाराज दैठणेकर, ह. भ. प.कृष्णा महाराज बोंपीलवार कार्लेकर, ह. भ.
प.प्रणव स्वामी महाराज पडोळे, ह. भ. प.कृष्णा महाराज चिखलीकरचिखलीकर यांची
सात दिवस किर्तन सेवा होणार असुन 10 जानेवारी रोजी काल्याचे किर्तन ह. भ.
प.पंजाब महाराज गऊळ बाजार यांचे होणार आहे. ज्ञानेश्वरी पारायण व्यासपीठ ह.
भ. प.शिवाजी महाराज वडगावकर, ह. भ. प.कृष्णा लुम्दे हे पाहणार आहेत.
भारुडी भजनी मंडळ सिबदरा येथील आहे.
दि. 8 जानेवारी रोजी रात्री नादब्रह्म
संगीत संच नांदेड सचिन बोंपीलवार, कृष्णा बोंपीलवार संच व यांच्या मैफील चा
कार्यक्रम सादर होणार आहे. गायनाचार्य ह. भ. प.ज्ञानेश्वर बोटेवाड, ह. भ.
प. मारूती महाराज राहुलवाड, ह. भ. प.आनंद गोसलवाड , ह. भ. प. भगवान
गुफंलवाड, मृदंगाचार्य ह. भ. प. साईनाथ राहुलवाड, तबलावादक,विणेकरी ह. भ.
प.अशोक महाराज बोंपीलवार, हार्मोणीयम ह. भ. प.रामदास महाराज बोंपीलवार,
चौपदार ह. भ. प.रामजी महाराज काईतवाड,विनोद साऊंड सर्विस आहे. या अखंड
हरिनाम सप्ताह च्या निमित्ताने गावात आठ दिवस भक्तिमय वातावरण असणार असुन
या सप्ताहाचा पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्याला असे आवाहन कारला
ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
