डॉ.गोणारकर,डॉ.सरोदे,डॉ.ढवळे,पवार, दासरवार,डॉ.राठोड,प्रा.पवार,जाधव, ह.भ.प.मोरे,हिवरे,पाटील,कांबळे आदी पुरस्काराचे मानकरी.
हिमायतनगर प्रतिनिधी(सोपान बोंपीलवार) डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान नांदेड च्यावतिने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान असलेल्या मान्यवरांना देण्यात येणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय समता गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले असून प्रा.डॉ.राजेंद्र गोणारकर,कामाजी पवार,डॉ.रवी सरोदे,संतोष दासरवार,प्रा.मनोहर पवार,डॉ. विलास ढवळे,विजय जाधव,ह.भ.प. अरविंद महाराज मोरे,आशिष हिवरे आदी या पुरस्काराचे मानकरी ठरले असून एक दिवशीय पाचव्या बौद्ध धम्म परिषदेत येत्या दि.१४ जानेवारीला या पुरस्कार प्राप्त मान्यवरांना सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा,बौध्द धम्म परिषदेचे संयोजक त्रिरत्नकुमार मा.भवरे कामारीकर यांनी दिली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान,नांदेड च्यावतिने दरवर्षी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान असलेल्या मान्यवरांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता गौरव राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते यासाठी निवड समिती प्रमुख सुप्रसिद्ध सिने अभिनेते डॉ.प्रमोद अंबाळकर,डॉ.पि.बी.नामवाड,त्रिरत्नकुमार मा. भवरे यांच्या नेतृत्वात कार्यरत असलेल्या समितीने सन २०२१-२२ या वर्षासाठीचे पुरस्कार जाहीर केले आहेत.
प्रा.डॉ.राजेंद्र गोणारकर,मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार,स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या परिक्षा मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.रवि सरोदे,डॉ.विलास ढवळे,प्रा.मनोहर पवार,नांदेड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष यांचे स्वीय सहाय्यक संतोष दासरवार,म.रा.तलाठी संघाचे जिल्हा उपाध्यक्ष विजय जाधव,सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी आशिष हिवरे,भोकरचे पोलीस निरीक्षक विकास पाटील, हिमायतनगरचे पोलीस निरीक्षक भगवान कांबळे,शासकीय गुत्तेदार अरुण उपलंचवार, ह.भ.प.अरविंद महाराज मोरे,साहित्यिक महेंद्र नरवाडे,जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता एस.बी.मेकेवार, हिमायतनगरचे वैद्यकीय अधिकारी डॉ.दामोधर राठोड,लोहा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी दिगांबर गायकवाड,प्रा.अविनाश नाईक व प्राथमिक आरोग्य केंद्र सरसम (बु.) येथील आरोग्य सेविका सौ.विजया रेणूराव कदम या मान्यवरांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता गौरव राज्यस्तरीय पुरस्कार २०२१-२२ जाहीर करण्यात आला आहे.
दरम्यान डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान नांदेड च्यावतिने आयोजित एकदिवशीय पाचवी बौद्ध धम्म परिषद सोनारी फाटा, ता.हिमायतनगर येथे दि.१४ जानेवारी २०२२ रोजी हिंगोलीचे लोकप्रिय खा.हेमंतभाऊ पाटील,हदगांव-हिमायतनगरचे आ.माधवराव पा.जवळगांवकर, नांदेड उत्तरचे आ.बालाजी कल्याणकर,नांदेड दक्षिणचे आ.मोहन हंबर्डे,मा.आ.नागेश पाटील आष्टीकर,नांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.मंगाराणी अंबुलगेकर,माजी अध्यक्षा श्रीमती शांताबाई जवळगांवकर,माजी महापौर शीलाताई भवरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्राप्त मान्यवरांना सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष व बहुजन टायगर युवा फोर्सचे संस्थापक तथा,बौद्ध धम्म परिषदेचे संयोजक त्रिरत्नकुमार मा.भवरे, निमंत्रक माजी सभापती जोगेंद्र नरवाडे,कैलास पाटील माने, आयोजक लक्ष्मणराव मा.भवरे,अनिल मादसवार,डॉ.मनोज राऊत,राहुल लोणे, डॉ.सारीपुत्र गोखले,शेख खय्युम,शाहीर नरेंद्र दोराटे,शाहीर रमेश नारलेवाड, शाहीर सुभाष गुंडेकर,शिवाजी डोखळे, अविनाश कदम आदींनी दिली.
..
