दैनिक पुण्य नगरी चे कालीदास जाहगीरदार यांना मराठवाडास्तरीय पुरस्कार
सकाळचे बातमीदार प्रकाश जैन यांना कै. सुधाकरराव डोईफोडे सामाजिक पत्रकारिता पुरस्कार
हिमायतनगर प्रतिनिधी/ हिंदवी बाणा लाईव्हच्या वर्धापण दिनाचे औचित्य साधून कै.दुर्गादास सराफ पत्रकार प्रतिष्ठाणचे पुरस्कार जाहीर करण्यात आले. बाळशास्त्री जांभेकर मराठवाडा भुषण पुरस्कार दैनिक पुण्यनगरीचे नांदेड जिल्हा प्रतिनीधी कालीदास जहागीरदार यांना जाहीर झाला आहे. तर हिमायतनगर सकाळचे बातमीदार प्रकाश जैन यांना कै. सुधाकरराव डोईफोडे सामाजिक पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
६ जानेवारी रोजी दर्पण दिन असल्याने पत्रकारांचा गौरव झाला पाहिजे या
उद्देशाने कै. दुर्गादास सराफ पत्रकार प्रतिष्ठान च्या वतिने गेल्या तिन
वर्षापासुन उत्कृष्ट पत्रकारांना पुरस्कार देवुन गौरव केला जातो. २५
डिसेंबर पर्यंत प्रस्ताव मागवीण्यात आले होते.जिल्ह्यातील सर्व तालुक्यातुन
प्रस्ताव आले आहेत.
हिमायतनगर
येथील दैनिक सकाळ चे बातमीदार प्रकाश जैन यांनी गेल्या तिस वर्षापासून
पत्रकारितेच्या माध्यमातून अनेकांना आपल्या लिखाणातून न्याय मिळवून
देण्याचे कार्य केले. आजही ते शहरासह ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या सतत
पत्रकारितेच्या माध्यमातून शासन दरबारी माडुंन न्याय देण्यासाठी प्रयत्नशील
असताना त्यांच्या पत्रकारितेची दखल घेत त्यांना कै. सुधाकरराव डोईफोडे
सामाजिक पत्रकारिता जाहीर पुरस्कार जाहीर झाला आहे.
छत्रपती
शिवाजी महाराज महाराष्ट्र भुषण राज्यस्तरीय पुरस्कार लोकशाही न्यूज चे
वृत्तनिवेदक ऋषी देसाई ( मुंबई) यांना व बाळशास्त्री जांभेकर मराठवाडा
भुषण पुरस्कार दैनिक पुण्यनगरीचे जिल्हाप्रतिनीधी कालीदास जहागीरदार
(नांदेड)यांना व दैनिक नांदेड चौफेरचे संपादक आरेफ खान यांना महात्मा फुले
उत्कृष्ठ पत्रकारीता जिल्हास्तरीय पुरस्कार जाहिर झाला आहे.
डॉ.
बाबासाहेब आंबेडकर ग्रामीण विकास पत्रकारिता पुरस्कार प्रा.डॉ.गंगाधर
तोगरे, लोकमत (कंधार), लोकमान्य टिळक पत्रकारिता पुरस्कार सतीश शिंदे
पुढारी (धर्माबाद ), साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शोध पत्रकारिता
पुरस्कार,अहमद शेख पुढारी (लोहा ), प्रल्हाद केशव अत्रे आदर्श पत्रकारिता
पुरस्कार पंडितराव पतंगे पुण्यनगरी ( हदगाव ),
प्रबोधनकार
ठाकरे युवा पत्रकारिता पुरस्कार, बालाजी पांचाळ देशोन्नती ( भोकर
),कै.वसंतराव नाईक हरितक्रांती पत्रकारिता पुरस्कार श्री भुषण पारळकर सामना
( नायगाव), डॉ ए.पी.जे.अब्दुल कलाम पत्रकारिता पुरस्कार, साजिद माजिद खान
सकाळ ( माहूर ),बाळासाहेब ठाकरे रोखठोक पत्रकारिता पुरस्कार अशीष देशपांडे
गोदातीर ( किनवट ),डॉ.शंकरराव चव्हाण पत्रकारिता पुरस्कार,रामचंद्र भंडरवार
देशोन्नती (देगलुर ),कै.सुधाकरराव डोईफोडे सामाजिक पत्रकारिता पुरस्कार,
प्रकाश जैन , सकाळ (हिमायतनगर ), कै. माधवराव आंबुलगेकर पत्रकारिता
पुरस्कार गौतम लंके लोकमत ,( कासराळी ता. बिलोली ), कै.विलासराव देशमुख
पत्रकारिता पुरस्कार नामदेव राहीरे उ.मराठवाडा (मुदखेड ),
कै.गोपीनाथराव
मुंडे पत्रकारिता पुरस्कार नारायण यम्मेवार,लोकपत्र ( उमरी ),गौरी लंकेश
पत्रकारिता पुरस्कार उदयकुमार गोंजकर गावकरी ( अर्धापूर ),
कै.
दुर्गादास सराफ पत्रकारिता पुरस्कार शिवाजी कोनापुरे प्रजावानी ( मुखेड )
यांना जाहिर करण्यात आले आहेत . तर सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या एका
निस्वार्थी व्यक्तीस सामाजिक पुरस्कार दिल्या जातो यावर्षी कंधार भूषण
सामाजिक पुरस्कार विठ्ठल नारायण मुनगीलवार यांना जाहिर करण्यात आला आहे.
हे पुरस्कार वितरण सोहळा कंधार येथे होणार असुन या कार्यक्रमास कॅबेनट
मंत्री येणार आहेत.त्यांची तारीखा घेऊन पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमाची
तारीख कळवण्यात येणार असल्याची माहिती दुर्गादास सराफ पत्रकार
प्रतिष्ठानच्या वतिने देण्यात आली आहे.
