कारला सिबदरा गावांच्या मुख्य रस्त्याच्या कामाचे आ. जवळगावकरांच्या हस्ते भुमिपुज़

राजा भगिरथ मंदिराच्या सभागृहासाठी दहा लाख रुपये


हिमायतनगर प्रतिनिधी
/तालुक्यातील मौजे सिबदरा, कार्ला पी रस्त्यासाठी मुख्यमंत्री सडक योजनेतून कोट्यवधींचा निधी मंजूर झाला. त्यामुळे ग्रामस्थांनी  आ. माधवराव पाटील जवळगावकर यांचे ढोलताशाच्या गजरात जंगी स्वागत केले. यावेळी आ.माधवराव पाटील जळगावकर यांच्या हस्ते या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन सोहळा थाटात संपन्न झाला.

तालुक्यातील मौजे सिबदरा या २.५२० किलोमीटर रस्त्यासाठी डांबरीकरण व गावातील २२० मीटर सिमेंट काँक्रेट रस्ता, नाल्यावरील १२ मीटरचा स्लॅब पूल, २ नळकांडी पुलासाठी १ कोटी ५५ लक्ष रुपयाचा निधी मंजूर झाला आहे. तसेच कार्ला पी येथील १४३० मीटर रस्त्यापैकी ११८० मजबुतीकरण व डांबरीकरण व २५० मीटर गावातील रस्त्याचे सिमेंट काँक्रेट रस्ता व नळकांडी पूल, नाल्यावरील १२ मीटर लांबीच्या स्लॅब पूल यासाठी अंदाजित ८७.६० लक्ष रुपयाचा निधी मंजूर झाला आहे. या मंजूर दोन्ही रस्त्याच्या कामाला शुक्रवारी आ.माधवराव पाटील जळगावकर यांच्या हस्ते भूमिपूजन करून सुरुवात झाली आहे.

कारला ग्रामस्थांनी आ. माधवराव पाटील जवळगावकर यांचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी गावकर्यांनी आ.माधवराव पाटील जवळगावकर यांचं भव्य स्वागत करून आभार मानले, तसेच या गावातील अन्य विकास कामासाठी यापुढे निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिल. 

याप्रसंगी तहसीलदार डी.एन.गायकवाड,माजी जि. प.सदस्य सुभाष राठोड,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विकास पाटील, तंटामुक्त समिती अध्यक्ष डॉ.गफार ,संजय माने, माजी संचालक गणेश शिंदे, कृउबाचे सभापती डॉ.प्रकाश वनखेडे,माजी तालुकाध्यक्ष जनार्दन ताडेवाड,गुतेदार उमेश पाटील सुर्यवंशी,सरपंच गजानन कदम, प्रा डि.डि.घोडगे ,उपसरपंच रोशन धनवे, रामेश्वर यमजलवाड, नाथा चव्हाण,शिवाजी एटलेवाड,माजी जी.प.सदस्य समद खान, माजी नगराध्यक्ष अखिल भाई, माजी कृउबा संचालक रफिक भाई,  फेरोजखान पठाण, शे.रहीम पटेल, अश्रफ भाई, संतोष शिंदे, खालिद भाई,आडेलु चपलवाड,अ.रज्जाक भाई, दत्ता चितंलवाड,ग्रामसेवक नारायण काळे, गजानन मिराशे, पिटेश कदम, रामराव मोरे,आनंद रासमवाड, सुनिल घोडगे, श्रीराम मुठ्ठेवाड,इश्वर आचमवाड, रमेश चितंलवाड, अशोक आचमवाड, रामदास यमजलवाड, यांच्यासह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.