ओमप्रकाश चव्हाण यांची युक्रेन येथे वैद्यकीय शिक्षणासाठी निवड
हिमायतनगर प्रतिनिधी/.मणुष्य जिवनात आई वडिलांनी आपल्या मुलांना लहानपणी योग्य शिक्षण, चांगले संस्कार उत्तम विचारांची शिकवण दिली पाहिजे तरच भविष्यात आपली संतती हि संपत्ती पेक्षा महत्त्वाची असल्याची जाणीव नक्की होणार आहे म्हणून प्रत्येकांनी संपत्ती कडे लक्ष न देता संतती कडे लक्ष केले पाहिजे असे प्रतिपादन ह. भ. प. शामसुंदर महाराज आष्टीकर यांनी कारला येथे केले आहे.
कारला येथील नाथा पाटील चव्हाण यांचा मुलगा ओमप्रकाश चव्हाण यांना वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेन ला पाठविण्यात आले असून यानिमित्ताने गावात नगर भोजन देण्यात आले होते. सांयकाळी ह. भ. प. आष्टीकर महाराज यांच्या किर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ओमप्रकाश चव्हाण यांचा प्रगती कोचिंग क्लासेस व ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला आहे. या निमित्ताने किर्तन सेवेत उपस्थिती भाविकांना मार्गदर्शन करताना आष्टीकर महाराज म्हणाले की आजचा प्रत्येक माणूस आपल्या मुलां बाळाकडे शिक्षण देण्यात दुर्लक्ष करीत आहेत परंतु आपल्या पाल्यांचे भविष्य घडवायचे असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही म्हणून प्रत्येक पालकांनी आपल्या संतती च्या भविष्याची काळजी घेणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले व ओमप्रकाश चव्हाण हा युक्रेन येथे शिक्षण घेऊन भविष्यात वैद्यकीय क्षेत्रात यशस्वी होईल आणि गावचे नाव उज्ज्वल करणार आहे प्रत्येक विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी पुढाकार घेतला पाहिजे असेही महाराज यांनी सांगितले.
यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष डॉ गफार, प्रा.ज्ञानेश्रर घोडगे, नागेश कोथळकर यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपाचे आशिष सकवान, राम सुर्यवंशी, ह. भ. प. शिवाजी महाराज जाधव,प्रभाकर बाचकलवाड,रामदास बोंपीलवार,मारोती ढाणके, अवधूत पाटील कल्याणकर, गुडेटवार,सरपंच गजानन कदम,माधव मिराशे,शिवाजी एटलेवाड, सुनिल घोडगे, गजानन मिराशे, अशोक चपलवाड,रामराव पाटील, बालाजी मोरे,रामराव लुम्दे, राजेश ढाणके,रामेश्वर यमजलवाड,पिटेश कदम, केशव रासमवाड, नागसेन गोखले,साईनाथ कोथळकर, गौतम कांबळे,जनार्दन मुठेवाड,यांच्यासह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.
