टाकराळा जंगलात एकाच कुटुंबातील तिन जणांचे मृतदेह आढळले

 एक जण बेपत्ता... आई, मुलाची हत्या पित्याचा गळफास


हिमायतनगर प्रतिनिधी/...
तालुक्यातील टाकराळा जंगलात एकाच कुटुंबातील तिन जणांचे मृतदेह आढळून आल्याच्या घटनेने जिह्यात खळबळ उडाली असून. आईसह एका 17 वर्षीय मुलाची दगडाने ठेचून हत्या झाली आहे तर पित्याचा गळफास घेतलेल्या अवस्थेत एकाच कुटुंबातील तिन जणांचे मृतदेह टाकराळा जंगलात दि. 6 डिसेंबर रोजी आढळून आली आहेत तर याच कुटुंबातील एक 18 वर्षीय मुलगा बेपत्ता असल्याची माहिती आहे. हि घटना सोमवारी उघडकीस आली असली तरी सदरील घटनेला जवळपास आठ दिवस उलटले असावेत असा पोलीसांचा प्राथमिक अंदाज आहे.मृतदेहाची दृगंधी सुटल्याने घटनास्थळी च श्वच्छेदन करण्यात आले आहे.

हिमायतनगर तालुक्यातील टेंभी येथील एकाच कुटुंबातील चार व्यक्ति गेल्या आठ दिवसापासून बेपत्ता असल्याची माहिती समोर आली. त्यापैकी आई सिमा शांतामन कावळे वय(40) मुलगा सुजित शांतामन कांवळे वय (17) आई व मुलाचा मृतदेह दोन्ही हात बांधलेल्या व दगडाने ठेवलेल्या अवस्थेत आढळून आले तर वडील शांतामन सोमाजी कावळे (45) यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले दरम्यान जंगलात मृतदेह पडलेले असल्याची खबर पोहचल्यानंतर हिमायतनगर पोलीस प्रथम घटनास्थळी पोहचले परंतु घटनास्थळ हे तामसा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ऐत असल्याने तामसा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. भोकर विभागाचे अतिरिक्त पोलीस अधिकारी विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजणगावकर, एपीआय अशोक उजगीरे, तामसा पोलीस स्टेशनचे सपोनि किरवले यांनी घटनास्थळी धाव घेतली श्वानपथकासही पाचारण करण्यात आले. दरम्यान याच कुटुंबातील 18 वर्षीय मुलगा सुजित शांतामन कावळे हा अद्यापही बेपत्ता असून पोलीस शोध घेत आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.