आपला उमेदवार म्हणून सर्वांनी नगरपंचायतवर कॉंग्रेसचा झेंडा फडकविण्यासाठी एकदिलाने काम करावे....आ.जवळगावकर.

 आपला उमेदवार म्हणून सर्वांनी नगरपंचायतवर कॉंग्रेसचा झेंडा फडकविण्यासाठी एकदिलाने काम करा....आ.जवळगावकर.  


हिमायतनगर/
नगरपंचायत चे प्रभाग निहाय आरक्षण जाहीर झाले असून आपल्या कॉंग्रेस पक्षाकडुन एका प्रभागासाठी किमान दहा जणांची अपेक्षा राहणे चुक नाही.ईच्छुक अनेक असले तरी उमेदवारी एकानाच मिळणार आहे.तो उमेदवार आपलाच म्हणुन सर्वांनी एकदिलाने प्रामाणिकपणे काम करुन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांचे हात बळकट करुन शहरासह काही प्रभाग विकासापासून वंचीत आहे.ते विकास साध्य करण्यासाठी एकजुटीने कॉंग्रेसची सत्ता आणावी असे आवाहन आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी केले.  

                  जवळगावयेथे २१ नोव्हेंबर रोजी तालुक्यातील कॉंग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्त्यांसह शहरातील नगरपंचायत निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या कार्यकर्त्याची बैठक आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली.अध्यक्षीय समारोप करताना आ.जवळगावकर पुढे बोलताना म्हणाले की, ग्रामपंचायत चे रुपांतर नगरपंचायत मध्ये आणण्यासाठी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या माध्यमातून शहरवासीयांचे स्वप्न पुर्ण झाले आहे.त्याच्याच मार्गदर्शनाखाली शहरात सर्वच समाज बांधवांसाठी कोट्यावधी रुपयांची कामे झाली आहेत हे कोणालाच नाकारता येत नाही.राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असुन जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण आहेत.आपल्या विधानसभा क्षेत्रातील विकासासाठी त्यांचे अनमोल असे सहकार्य लाभले आहे.भविष्यात त्यांच्या माध्यमातून शहरांचा ऊर्वरीत विकास होणार आहे.आपल्या इच्छुकांपैकी ज्यांना उमेदवारी मिळेल त्याच्या विजयासाठी सर्वांनी आपापसातील हेवेदावे बाजुला सारुन कॉंग्रेस पक्षाचा झेंडा फडकावा असे आवाहन केले.   आगामी काळात ग्रा.प.पोटनिवडणुका,सेवा सहकारी सोसायटी निवडणुका बिनविरोध होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे ही ते म्हणाले.                                यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य हाजी समदभाई , बॅंकेचे माजी संचालक गणेशराव शिंदे, दिलीप राठोड,सरपच परमेश्वर गोपतवाड याचे समायोचीत भाषणे झाली.बैठकिस माजी जी.प.सदस्य सुभाषराव राठोड, कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष विकास पाटील देवसरकर,शेख रफिकभाई,सभापती डॉ.प्रकाश वानखेडे,प्रथमनगराध्यक्ष अ आखील अ हमीद सेट, जोगेद्र नरवाडे,बापुराव आडे,   शेख रहिम सेट,शिवाजी माने,दिलीप पाटील लोहरेकर,  सुभाषराव बलपेलवाड,   दता पवार  ,नारायण वाळके,सजय पाटील, गगाराम ढोले, ,बळवत जाधव,नासरखान,शाम ढगे,परसराम ढाले,राजेश चिकनेपवाड,बालाजी पुठेवाड,कानबा पोपलवार,आनद मुतनेपवाड, पाडुरग पाटील ,राजीव पाटील पारवेकर,नितीन कुभेकर,शेख मुखीद,सदिप झळके,विजय सुर्यवशी याच्यासह न.पा.चे ईच्छुक ऊमेदवारासह समर्थकाची मोठ्या सख्येने ऊपस्थिती होती.प्रस्ताविक गजानन सुर्यवशी यानी तर अभार सजय माने यानी मानले.  

    पालकमत्री,आमदार आपले आहेत हे विसरू नका...गोपतवाड  

   येणा-या नगरपचायत निवडणुकिसाठी पक्ष ज्याना ऊमेदवारी देईल त्याच्या पाठिशी आपण सर्वानी रहावे.विकासासाठी जिल्हयाचे पालकमत्री आशोकराव चव्हाण आणि आ.माधवराव पाटील जवळगावकर आहेत या बाबीचा विचार करुन शहरासाठी कॉग्रेसची सता गरजेचे असल्याचे ख.वि.सघाचे सचालक परमेश्वर गोपतवाड म्हणाले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.