आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्या प्रयत्नातून मार्गी लागणार
हिमायतनगर प्रतिनिधी (सोपान बोंपीलवार)
जल जिवन मिशन या योजने अंतर्गत हदगाव व हिमायतनगर तालुक्यातील 132 , गावांना इसापूर धरण येथून पाणी लिफ्ट करून पाणी पुरवठा योजना करण्या साठी संबधित महाराष्ट्र जिवन प्राधिकरण या यंत्रनेसं सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने वरील कामाच्या सर्व्ह चे काम पूर्ण झाले असून अंदाजपत्रक तयार करून त्यास तांत्रिक व प्रशासकीय मान्यता घेण्या साठी आ. माधवराव पाटील जवळगावकर यांचा पाठपुरावा सुरु आहे .ही योजना लवकर मंजूर व्हावी या साठी माघील आठवड्यात पाणी पुरवठा व स्वछता मंत्री मा. नां श्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन मागणी देखील केली आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चे अधीक्षक अभियंता यांना भ्रमणध्वनी वरुन संपर्क साधत योजने चे अंदाजपत्रक लवकर मंजुरी साठी शासना कडे सादर करण्याच्या सूचना दिल्या व हदगाव येथील संपर्क कार्यालयात महाराष्ट्र जिवन प्राधिकरण चे अधीक्षक अभियंता लोलापोडव कार्यकारी अभियंता बोडके व त्यांच्या सह सर्व्हे चे काम करणारी टीम यांची बैठक आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी घेऊन सदरील योजने बाबत आढावा घेतला आहे.
या वेळी अधीक्षक अभियंता लोलापोड यांनी अंदाजपत्रकांचे काम अंतिम टप्यात आले असून लवकरच मंजुरी साठी शासना कडे सादर करणार असल्याचे सांगितले त्या मुळे आता हदगाव व हिमायतनगर तालुक्यातील 132 गावांचा कायम स्वरूपी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्या प्रयत्ना मुळे सुटणार आहे
