दुष्काळी अनुदान वाटप गाव निहाय वाटप
हिमायतनगर प्रतिनिधी/ नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेत शेतकऱ्यांचे दुष्काळ अनुदान जमा झाले असून सदरील अनुदान हे गाव निहाय वाटप करण्यात येणार असल्याची माहिती शाखा अधिकारी पि.जि.वाडेकर यांनी दिली आहे.
हिमायतनगर येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेत दुष्काळ अनुदान वाटप करताना शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी होत असल्याने सदरील शेतकऱ्यांचे अनुदान हे गाव निहाय वाटप करण्याचे आदेश वरिष्ठांनी दिल्या नुसार गाव निहाय वाटप करण्यात येणार असल्याचे शाखा अधिकारी पि. जि. वाडेकर यांनी बोलतांना दिली आहे.
ज्या तारखेला गाव लागेल त्याच दिवशी शेतकऱ्यांनी बँकेत येण्याचे आवाहन शाखा अधिकारी वाडेकर यांनी केले आहे.गाव निहाय धानोरा 20 डिसेंबर ते 22 डिसेंबर पर्यंत वाटप होणार आहे. दुधड 23 ते 24 डिसेंबर, दरेसरसम 27 ते 29 डिसेंबर, एकघरी 30 डिसेंबर रोजी, घारापुर 31 डिसेंबर, एकंबा 1 जानेवारी ते 3 जानेवारी , हिमायतनगर 4 ते 7 जानेवारी, जिरोना 10 ते 11 जानेवारी, कारला 12 ते 14 जानेवारी अशा प्रकारे गाव निहाय अनुदान वाटप होणार असून शेतकऱ्यांनी गाव लागेल त्याच तारखेला बँकेत अनुदान उचलण्याकरीता ऐण्याचे अवाहन करण्यात आले आहे.
