हिंगोली /औंढा : राजकारणाच्या माध्यमातून शिवसेनेच्या ८० टक्के समाजकारण आणि २० राजकारण या धोरणानानुसार समाजातील शेवटच्या घटकांसाठी तळमळीने कार्य करा जनता तुमच्यावर नक्की विश्वास ठेवून विजयी करेल आणि शिवसेनेचा भगवा औंढा नगरपंचायतीवर फडकवा . नियोजित आराखड्यानुसार औंढा शहरात जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्यासोबतच विकासकामे केली जातील आणि औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग देवस्थानाला राष्ट्रीय पातळीवर आणखी नावलौकिक प्राप्त करून देऊ आणि नगरपंचायतीचा चेहरामोहरा बदलून दाखवू असे मार्गदर्शनपर प्रतिपादन खासदार हेमंत पाटील यांनी औंढा नगरपंचायत निवडणुकी दरम्यान आयोजित केलेल्या उमेदवारांच्या बैठकीत केले.
औंढा नगरपंचायतीच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर जोरात प्रचाराला सुरवात झाली असून खासदार हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली औंढा नगरपंचायत निवडणुकीत विजयासाठी चांगलीच तयारी केली आहे . त्याचाच भाग म्हणून शिवसेना उमेदवारांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीला खासदार हेमंत पाटील यांच्यासह शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरीचे आमदार संतोष बांगर, तालुका प्रमुख साहेबराव देशमुख, शहरप्रमुख अनिल देव, जसवंत काळे, नितीन होकर्णे, शिवसेनेचे औंढा नगर पंचायत मधील सर्वच अधिकृत उमेदवार दिलीप कुमार राठोड, सपना प्रदीप कनकुटे, तांबोळी नदीमा फातेमा, पवार शितल विष्णू कुमार, राजू विठ्ठल खंदारे, मुळे विजयमाला राम,रासेखा बेगम शेख सिद्धीक, राहुल दंतवार, जाधव शिला तुळशीराम, देशमुख जया अनिल, विद्या प्रमोद देव, देशमुख गणेश बाबाराव, शिंदे शारदा अनिल, मनोज शंकरराव काळे,यांची उपस्थिती होती . यावेळी बोलताना खासदार हेमंत पाटील म्हणाले कि, सर्वप्रथम उमेदवारांनी शिवसेनेची भूमिका लक्षात घ्यावी आणि शिवसेनेच्या धोरणानुसार पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना अपेक्षित कार्य करावे . ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण यानुसार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत काम करणे हि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण मनात ठेवून कार्य केल्यास जनता तुमच्यावर नक्कीच विश्वास ठेवून प्रचंड मताधिक्याने विजयी करेल यात दुमत नाही . आणि पक्षाने तुमच्यावर विश्वास ठेवून दिलेल्या उमेदरवारीला सार्थ ठरवत औंढा नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकवा सर्वानी एकजुटीने आणि निस्वार्थ भावनेने कार्य केल्यास विजय तुमचाच असेल असा भक्कम विश्वास सुद्धा खासदार हेमंत पाटील यांनी सर्व उमेदवारांना देऊन त्यांचे अभिनंदन केले . बैठकीला शिवसेनेतील सर्व ज्येष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक, युवासैनिक पदाधिकारी,मोठ्या संख्येने उपस्थित होते.
