हिमायतनगर प्रतिनिधी/महाराष्ट्र शासनाच्या वतीने तहसील कार्यालय, हिमायतनगर अंतर्गत जवळगाव महसूल मंडळामार्फत आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत समाधान शिबिर उत्साहात संपन्न झाले.शिबिरात महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील विविध सुधारणा, मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना तसेच डिजिटल 7/12 च्या वैधतेबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्याबाबत संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या व जास्तीत जास्त नागरिकांनी समाधान शिबिराच्या माध्यमातून आपल्या समस्या सोडवून घ्याव्यात असे आवाहन करण्यात आले.
या आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत समाधान शिबिरात आ. बाबुराव कोहळीकर,अजय शिंदे उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) , तहसीलदार पल्लवी टेमकर, उपस्थित मान्यवर व अधिकाऱ्यांच्या हस्ते या शिबिरात विशेष सहाय्य योजनेअंतर्गत (संजय गांधी योजना, इंदिरा गांधी योजना व श्रावण बाळ योजना) 35 लाभार्थ्यांना मंजुरी आदेश, जिवंत सातबारा मोहिमेअंतर्गत 9 सातबारा, लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत विविध 75 प्रमाणपत्रे, आयुष्मान आरोग्य कार्ड 110, भूविकास बँकेचे बोजे कमी केलेल्या 25 सातबाऱ्यांचे वितरण, तसेच 28 शिधापत्रिका वाटप करण्यात आल्या. तसेच आत्महत्याग्रस्त शेतकरी बासरकर यांच्या पत्नीला 1 लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले.याशिवाय कृषी विभागामार्फत राज्य कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत 2 मोठे व 2 छोटे ट्रॅक्टर व 2 रोटावेटर वाटप करण्यात आले.कार्यक्रमात आरोग्य विभागाचे डॉ. नखाते, महिला व बाल विकास विभागाचे सीडीपीओ श्री. शेटे, दुय्यम निबंधक श्रीमती कदम ,. माळगे व श्री. मादसवार , नोडल अधिकारी श्री. एच. जी. पठाण यांच्या परिश्रमामुळे यशस्वीपणे पार पडले. तसेच श्री. एल. एच. पंगे होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळ अधिकारी जवळगाव श्री. जी. के. आनरवाड, मंडळ अधिकारी बी. एम. चव्हाण, तहसील कार्यालयाचे महसूल अधिकारी एम. झेड. सिद्दिकी, श्री. जामकर, तसेच जवळगाव मंडळातील ग्राम महसूल अधिकारी श्री. अमोल कदम, श्री. के. एन. पाईकराव, श्रीमती अश्विनी आवटे, श्रीमती हट्टेकर मॅडम, श्री. अंकमवार यांनी विशेष परिश्रम घेतले.
शेतकरी, नागरिक, विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी तसेच योजनांच्या लाभार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे जवळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिर यशस्वीरित्या पार पडले. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेतला.
