धानोरा येथील एकनाथ महाराज बीज उत्सव मंगळवारी

हिमायतनगर प्रतिनिधी/- तालुक्यातील धानोरा ज.येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही एकनाथ महाराज बीज उत्सव सोहळा होणार असून या भक्तीमय सोहळ्यात पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी उपस्थित रहावे असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.
        धानोरा ज.येथे अनेक दिवसापासून एकनाथ महाराज बीज उत्सवाची परंपरा असुन या बीज उत्सव निमित्ताने दि. 3 फेब्रुवारी रोजी सकाळी श्री परमेश्वर महाराज इटेवाड यांच्या घरून एकनाथ महाराजांची पालखी निघणार आहे.दुपारी 12 ते 02  
 राष्ट्रीय किर्तनकार ह.भ.प.रामेश्वर महाराज गुंड पाटील सीरपुरकर यांची किर्तन सेवा होणार आहे.या किर्तन सेवेत संगीत भजनाची साथ गायणाचार्य ह.भ.प.शेषराव महाराज टाकळीकर, चंद्रकांत महाराज गोरे, भगवान महाराज गु़फंलवाड,मृदंगाचार्य चैतन्य महाराज रेणापुर, विश्वनाथ महाराज वडगांव हे साथ देणार आहेत.या बीज उत्सव भक्तीमय कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन एकनाथ महाराज मंदिर संस्थान व धानोरा ग्रामस्थांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.