प्रभावानंतरही जनतेच्या निराकरणासाठी अहोरात्र फिरणारा जनतेच्या मनातील लोकनेता माधवराव पाटील जवळगावकर

    सर्वांच्या समस्या म्हणजे आपल्याच समस्या समजून त्या सोडविण्यासाठी रात्रीचा दिवस करण्याची जवळगावकर परिवारांची हातोटी लोकनेते मधाराव पाटील जवळगावकर यांनी सत्ता असो अथवा नसो चालुच ठेवल्यामुळे तळागाळातील वर्गासह सर्वांनाच ते आपला लोकनेता म्हणून वाटत आहेत . निवडणूक म्हटले कि जय पराजय होत असतो परंतु पराभूत झाल्यानंतर अनेक नेते मतदार संघाकडे पाट फिरवतात परंतु जवळगावकर त्यासाटी अपवाद असून प्रवभावानंतर देखील जनतेसाठी सुख दुखात सतत राहून जनतेच्या समस्यांचे निराकरण करत फिरणारा लोकनेता मनून जनतेच्या ह्रदयात स्थान निर्माण केले आहे.
आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी वडील कै. निवृत्तीराव पाटील पवार, बंधू कै.पंजाबराव पाटीज जवळगावकर यांच्या कार्यपध्दतीचे अनुकरण करुन मातोश्री माजी जि.प.अध्यक्षा श्रीमती शांताबाई पवार यांच्या सानिध्यात राहून कामे करुन जनतेची मने जिंकली आहेत.
चव्हाण आणि जवळगावकर घराण्याचे घनिष्ठ सबंध असून राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण साहेबांचे माजी आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्या वर राजकीय अतुट असे प्रेम असल्याचे हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदार संघासह संबंध नांदेड जिल्हा ल्याने पहिले आहे परंतु अशोक चव्हाण यांनी भाजपा प्रवेश केला . तरी चव्हाण साहेब नेते आहेत मी काँग्रेस पक्षात आहे शेवटपर्यंत राहणार असल्याचे ते सांगतात .
माजी आ.माधवराव पाटील जवळगावकर हे आजपर्यंतच्या त्यांच्या कार्यकाळात सधन वर्गातील असल्याचा भास कोणालाही झाला नाही. त्यांच्या माध्यमातून काम असेल तर कुठल्याही मध्यस्थीची गरज नसल्याचे विधानसभा मतदार संघ अनुभव घेत आहे. आजारी रुग्णासह जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पंचायत समिती, पोलिस स्टेशनची कुठलेही कामे पडली तर ते थेट भ्रमणध्वनीवर रात्री-बेरात्री त्यांना संपर्क करतात. एखाद्याचा मोबाईल रात्री २ वाजता आला दोन वेळेस आल्यानंतर आ.जवळगावकर पुन्हा स्वत: त्यांना बोलून आपल्या परिवारातील समस्या असल्यासारखे दाखवून तेवढ्याच तळमळीने त्या रात्री मी आहे. काळजी करु नका, दवाखान्याची सुविधा मिळून योग्य उपचार होईल, असे उत्तर देवून ते काम नेटाने करत असल्याचा अनुभव हजारो जणांना आला आहे. त्यांच्या बोलण्यामुळे रुग्णांचा आजार डॉक्टरांच्या उपचारापुर्वी हलका झाल्याचा भास रुग्णासह परिवाराना येत आहे.

आपल्या कार्यकुशलतेमुळे गरीबासह श्रींमत वर्गाना आ.माधवराव पाटील जवळगावकर म्हणजे आपल्या परिवारातील पालक,भाऊ असे ह्रदयात ठाण करुन ते बसल्यामुळे मतदार संघातील कोणी आपली इच्छा पुर्ण होत नसल्यामुळे त्यांना सोडून गेले तरी माजी आ.जवळगावकर यांच्या कर्तबगारीचा ठसा कायम मनावर बसलेली जनता मात्र त्यांच्या सोबत असल्याचे चित्र दिसत आहे.
   कॉग्रेस पक्षाला पडत्या काळात अनेक नेत्यांनी पक्ष सोडला असलातरी जवळगावकर यांचा २०२५ विधानसभा निवडणुकीत त्यांचा प्रभाव झाला असला तरी मतदार संगातील मतदारांचा जण संपरक तोंडाला नाही निवडणूक संपली कि अनेक नेते मतदारांना विसरून जातात परंतु माजी आमदार जवळगावकर याला अपवाद असून पराभूत झालो तरी माझी जनता माझं सर्वस्व असून त्यांच्या सुख दुखत सहभागी होणे माझा करतावें समजून ते आजही मतदार सांगतील जाइटच्या कामात मग्न असतात हीच त्यांची मोती हातोटी आहे
     गेल्या महिन्यात झालेल्या हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीत ज्वलगावकर गटाला प्रभू करण्यासाठी तीन मंत्र्यांचा सभा आयोजित केला होत्या परंतु मतदारांनी काँग्रेस पाशाला भू मत देत जवळगाकरांच्या विश्वासला आणि त्यांनी केलेल्या विकास कामाना प्रधान देत नगराध्यक्षासह सह ८ नगर सेवक निवडून दिले आहेत याबरोबरच हदगाव नगरपरिषेदत देखील ५ जागेवर नगरसेवक विजयची झाले आहेत . माजी आ.जवळगावकर यांनी करिष्मा केला असून या निवडणुकीत मतदारांनी जवळगावकर हेच विस्वासू नेते असल्याचे या निकालातून सिद्ध केले आहे .

काम करतांना पक्षाची शान, मान वाढविण्याचे काम ते अहोरात्र करीत आहेत. पक्षश्रेष्ठीसह सामान्यांच्या मनात घर करुन जनतेला आपलेसे करणारे व विकासाला प्राधान्य देवून मतदार संघाचा सर्वांगीण विकास साधण्याचा नेहमी प्रयत्न आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी केला आहे. राजकारण व समाजसेवेचा वारसा आणि गोरगरिब, वंचित व उपेक्षितांच्या सेवेचा आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी वसा घेतलेला असल्याने हदगाव-हिमायतनगर तालुक्यातील जनताही त्यांच्या पाठीशी हिमालयासारखी उभी राहात आली. समाजसेवा व सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडविण्याच्या त्यांच्या प्रामाणिक कार्यामुळे हजारोंच्या संख्येने ज्येष्ठ व युवा कार्यकर्ते त्यांच्याशी जोडले गेले.

मधूरभाषी स्वभाव, कमी बोलणे व जास्त काम करणे व कुशल संघटन कौशल्य, यामुळे आ.माधवराव पाटील जवळगावकर यांची लोकप्रिय नेते म्हणून सर्वदूर ओळख निर्माण झाली. सन २००९ व 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये तालुक्यातील जनतेने त्यांना स्पष्ट जनाधार देऊन महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये दोन वेळा पाठविले होते. जनतेच्या आशीर्वादाची जाण ठेवून त्यांनी आपल्या आमदारपदाच्या कार्यकाळात हदगाव- हिमायतनगर तालुक्यात विकासाची गंगा आणली. विकासाचे अनेक लहान- मोठी कामे त्यांनी पूर्ण केली. तर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत निवडुण आल्याने उर्वरीत कामांनाही गती मिळणार आहे. त्यांच्याकडे विकासाचे व्हिजन असल्यानेच जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत त्यांच्या मातोश्री श्रीमती शांताबाई पाटील जवळगावकर यांना जनतेने मोठ्या विश्वासाने निवडून दिले. हदगाव हिमायतनगर तालुक्यात जिल्हा परिषदेचे आठ सदस्य विजय झाले असल्याने श्रीमती शांताबाई पाटील जवळगावकर यांची जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची संधी मिळाली होती.अध्यक्ष पदाच्या कार्यकाळात पारदर्शक कारभार करुन हदगाव-हिमायतनगर तालुक्यात अनेक विकास कामे केली. माजी आमदार जवळगावकर निधानभेत पराभूत झाल्यानंतर जाणेही असलेला संपर्क तुटू दिला नाही कार्यकर्त्यांना कधी हुरहूर भासू दिली नाही प्रत्येकांच्या सुख दुखत सहभागी राहून माझी जनता हि निवडणुकी पुरती नाहीतर ती शेवटच्या श्वासापर्यंत आहे माझ्या जनतेच्या आर्शिवादामुळे दुसर्‍यांदा जन्म झाल्याचे ते वारंवार सांगत असतात. माझ्या श्वासात श्वास असेपर्यंत फक्त जनतेसाठी लढणार असल्याची भुमिका आजही घेऊन जनतेच्या समस्या निराकरणासाठी फिरतात हे विशेष आहे.
सर्वांच्या सुखासह दु:खात सहभागी होणारा असा हा लोकप्रिय नेता आ.माधवराव पाटील जवळगावकर यांना दै.पुण्य नगरी परिवारांच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.
 

संकलन---
सोपान बोंपिलवार
तालुका प्रतिनिधी हिमायतनगर  

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.