हिमायतनगर प्रतिनिधी//. शहरातील जातीय सलोखा कायम ठेवून सर्वांना सोबत घेऊन येणार्या काळात नगरपंचायत चे नवनिर्वाचित नगराध्यक्ष नगरसेवक विकास कामे पूर्ण करतील विकासासाठी निधीची कमतरता भासणार नाही नागरीकांनी टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही विकासात्मक कामे पूर्ण करून जनतेला दिलेल्या अश्वासनाची पुर्तता करणार असल्याचे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी नगराध्यक्ष पदग्रहण सोहळ्यात बोलताना केले आहे.
हिमायतनगर नगरपंचायत नवनिर्वाचित नगराध्यक्ष शेख रफिक शेख महेबुब यांच्यासह नगरसेवकांचा पदग्रहण सोहळा गुरुवारी नगरपंचायत प्रशासकीय कार्यालयात मोठ्या थाटामाटात माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला आहे.
या पदग्रहण सोहळ्यात मुख्याधिकारी सुर्यकांत ताडेवाड यांच्या हस्ते लोकनियुक्त नगराध्यक्ष शेख रफिकभाई यांच्या सह उपस्थित नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला तदनंतर नगराध्यक्ष यांना खुर्चीवर पदग्रहण करण्यात आले या पदग्रहण सोहळ्यात बोलताना माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर बोलताना म्हणाले की या शहरातील मतदार बांधवांनी पुन्हा एकदा विश्वास ठेवून नगरपंचायत मध्ये नगराध्यक्षासह नगरसेवकांना बहूमत दिले मतदारांनी दाखवलेला विश्वास येणाऱ्या काळात विकास कामांच्या माध्यमातून पुर्ण करु याचबरोबर शहरातील सर्व समाजातील नागरीकांच्या प्रश्न सोडविण्यासाठी नगराध्यक्ष नगरसेवक कटीबद्ध असणार आहेत असा विश्वास माजी आमदार जवळगावकर यांनी व्यक्त केला.
या सोहळ्यात परमेश्वर मंदिर ट्रस्ट चे उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ, जिल्हा काँग्रेस कमिटीचे सुभाष राठोड, डॉ प्रकाश वानखेडे,भाजपाचे डॉ राजेंद्र वानखेडे,तालुकाध्यक्ष गजानन सुर्यवंशी, शिवसेना उबाठा तालुकाप्रमुख संजय काईतवाड,भाजपा तालुकाध्यक्ष गजानन चायल,सभापती जनार्दन ताडेवाड, संचालक गणेश शिंदे,माजी नगराध्यक्ष अ .अखिल अ.हमिद ,शेख रहिम भाई, संजय माने,फेरोज खान,नगरसेवक समदखान,सरदार खान,शरद चायल,विनोद गुंडेवार, अब्दुल कलीम,भारत डाके,बाळू मेंडके, इलियास भाई,मुजतबा मतीन, रमेश पंडित, बाळासाहेब चवरे, शंकर पाटील,शाम ढगे,खालीद मतीन,योगेश चिलकावार, हानिफ सर,दिपक कात्रे,नगरपचायत चे कर्मचारी चंद्रशेखर महाजन,नरेश काटकर,राहुल बोकारे, बाळू हारडपकर,विठ्ठल शिंदे,या पदग्रहण सोहळ्यात कांग्रेस,भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवकांसह शहरातील विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरीक मोठ्या संख्येने उपस्थिती होते.
चौकट...
सर्व समाजाला घेऊन शहरातील कामे करणार - नगराध्यक्ष शेख रफिक
माझ्यावर शहरातील जनतेनी मोठी जबाबदारी दिली असुन सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन शरातील जनतेची कामे पूर्ण करणार असुन येणाऱ्या काळात शहरातील पाणी पुरवठा, स्वच्छता यासह मुख्य कामांना प्राधान्य देऊन गतीने कामे करू जनतेनी टाकलेला विश्वास सार्थ करून दाखवणार असल्याचे लोकनियुक्त नगराध्यक्ष शेख रफिकभाई यांनी व्यक्त केले आहे.
