हिमायतनगर प्रतिनिधी/ तालुक्यातील दुधड येथे सोयाबीन खरेदी केंद्राचा शुभारंभ बुधवारी माजी आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते करण्यात आला असुन अध्यक्षस्थानी बोलताना जवळगावकर म्हणाले की माल खरेदी करताना शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्या अशा सूचना देखील संचालकांना केल्या आहेत.
हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांचा माल खरेदी करीता दुधड येथे सोयाबीन खरेदी केंद्राचा शुभारंभ बुधवारी माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते करण्यात आला.या शुभारंभ प्रसंगी माजी आमदार जवळगावकर यांचा सत्कार संचालकांनी केला.या प्रसंगी बोलताना जवळगावकर म्हणाले की शेतकरी बांधवांना आपला माल देताना आँनलाईन नोंदणी प्रक्रिया करावी तसेच संचालकांनी आपल्या शेतकऱ्यांना या बाबतीत मार्गदर्शन करून वेळेवर माल घेऊन कुठल्याही प्रकारची शेतकऱ्यांना अडचण भासणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे.या शुभारंभ प्रसंगी हिमायतनगर तालुक्यातील दुधड,वाळकेवाडी,सोनारी परिसरातील शेतकरी, पदाधिकारी कार्यकर्ते संचालक उपस्थित होते.
