हिमायतनगर प्रतिनिधी/- हिमायतनगर शहरातील बाजार चौक मध्ये असलेल्या दक्षिण मुखी हनुमान मंदिरामध्ये गुरुवारी श्री दत्त जयंती निमित्ताने जन्मोत्सव मोठ्या उत्साहात टाळ मृदंगाच्या गजरामध्ये करण्यात आला दत्त जन्मोत्सव निमित्ताने पुरोहित कांतागुरू वाळके यांच्या वाणीतून प्रवचन झाले अभिषेक करण्यात आला आहे.
हिमायतनगर शहरातील बाजार चौक मध्ये असलेल्या दक्षिण मुखी श्री हनुमान मंदिरात श्री दत्तात्रेय जन्मोत्सव निमित्ताने सकाळपासून भाविकांनी दत्त नामाचा गजर केला व दुपारी श्री दत्तात्रयाचा जन्मोत्सव निमित्ताने दत्तात्रय मुर्तीची भव्य पुजा आरती केली तदनंतर जन्मौत्सव साजरा केला.सकाळ पासून मंदिरात दत्त नामाचा गजर कांतागुरू वाळके यांच्या वाणीतून हरी भजन प्रवचन झाले त्यानंतर दत्तात्रय अभिषेक संदीप पळशीकर यांनी संपत्निक केला भजणी मंडळांनी दत्तनाम जप केला प्रसाद वाटप झाला आहे.यावेळी श्री दत्त जयंती सोहळ्यास पोलिस निरीक्षक अमोल भगत, शिवसेना तालुकाप्रमुख रामभाऊ ठाकरे,हनुमान मंदिर कमिटीचे बाळासाहेब चवरे, संतोष पळशीकर, शिवकुमार तुप्तेवार, शंकर पाटील वानखेडे, अमोल बंडेवार, डॉ. आनंद माने, अमोल कोटुरवार,परमेश्वर सातव,गोपाल तिम्मापुरे, गजानन जुन्नावार, यांच्यासह शहरातील महिला पुरुष भाविक भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हिमायतनगर शहरातील दक्षिण मुखी हनुमान मंदीरात श्री दत्त जन्मोत्सव साजरा... दर्शनासाठी दिवसभर भाविकांची गर्दी
0
December 04, 2025
Tags
